शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरण : मंत्रालयातील लिपिकासह जि़प़ अभियंता जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:01 IST

राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने मंगळवारी नांदेड जिल्हा परिषदेतील सहायक अभियंता विशाल रंगराव पवार (रा़ राजगड तांडा, ता़ किनवट) व मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ लिपीक बाळासाहेब व्यंकट भातलोंढे (बोरावटी जि़लातूर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नांदेड -  राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने मंगळवारी नांदेड जिल्हा परिषदेतील सहायक अभियंता विशाल रंगराव पवार (रा़ राजगड तांडा, ता़ किनवट) व मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ लिपीक बाळासाहेब व्यंकट भातलोंढे (बोरावटी जि़लातूर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अटक करण्यात आलेल्या ३६ जणांपैकी ४ जणांना जामीन मिळाला आहे़ सोमवारी एसआयटीने लक्ष्मण शंकर चव्हाण, धनराज नरसिंग राठोड, अनिल रावसिंग जाधव, स्वप्निल शिवाजी पवार, सुनील बन्सी राठोड, कुणाल विनोद राठोड, चंदन केवलसिंघ राठोड, शिवप्रसाद विजय डुमणे या आठ जणांना अटक केली होती़ या आरोपींमध्ये तलाठी, लिपीक, कालवा निरीक्षक, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्यांचा समावेश होता़ या सर्वांना सोमवारी रात्री १० वाजता किनवट न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ त्यानंतर मंगळवारी या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही मंगळवारी किनवट न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़डमी परीक्षार्थीद्वारे मिळविल्या नोकऱ्याविशाल रंगराव पवार आणि बाळासाहेब व्यंकट भातलोंढे या दोघांनीही स्वत: परीक्षा न देता, आपल्या जागी डमी उमेदवार परिक्षेसाठी बसविला़ या उमेदवाराच्या माध्यमातूनच विशाल पवारने नांदेड जिल्हा परिषदेत सहायक अभियंता तर बाळासाहेब भातलोंढे याने मंत्रालयातील अन्न व नागरीपुरवठा विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकºया मिळविल्या़ अखेर मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली़

टॅग्स :ArrestअटकNandedनांदेडnewsबातम्या