शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जीप अपघातात मायलेकाचा मृत्यू

By admin | Updated: March 22, 2017 21:57 IST

आजारी बाळाला रुग्णालयातून उपचार करुन घरी परतत असताना जीप अपघातात आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक

ऑनलाइन लोकमतहदगाव (जि. नांदेड), दि. 22 - आजारी बाळाला रुग्णालयातून उपचार करुन घरी परतत असताना जीप अपघातात आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी तरोडा (ता. हदगाव) येथे घडली.तरोडा येथील पांडुरंग अंबाजी डुमणे ( वय ४०) हे उपजीविकेसाठी प्रवासी जीप चालवतात. दिवसभर जीपचा व्यवसाय केला. त्यांना दीड महिन्याचे बाळ. सायंकाळी घरी परतल्यानंतर बाळ आजारी असल्याचे समजताच त्यांनी पत्नी वंदनासह जीपने मनाठा गाठले. मनाठा येथे बाळावर डॉक्टरांना दाखवून परत गावाकडे जात असताना तरोडा गावाजवळ जीप उलटून वंदनाच्या अंगावर पडली.जीपखाली सापडून बाळ आणि त्याची आई जागीच दगावले. वंदनाबाई यांनी दोन्ही हातात बाळाला धरले होते. ‘त्या’ अलगद जीपच्या बाहेर पडल्या. नेमकी जीप उलटून दोघेही जीपखाली दबल्या. जीपमध्ये अन्य काही प्रवासी होते, त्यांना खरचटलेही नाही, चालक पांडुरंग यांना मार लागला. पांडुरंग यांना दोन मुली, मुलगा अशी अपत्य आहे. आई, बाळाचा मृत्यू झाल्याचे कळून दोघांची प्रेत घरी येताच मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांना हेलावून सोडणारा ठरला.  (वार्ताहर)