शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल धर्माबाद, उमरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:00 IST

परभणीला मागे टाकत धर्माबादने राज्यात इंधन दरवाढीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे़

ठळक मुद्देधर्माबादेत ९२़१९ तर उमरीत ९१़८९ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे़ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत़ राज्यात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर हे परभणीत असल्याचे बोलल्या जात होते़ परंतु परभणीला मागे टाकत धर्माबादने राज्यात इंधन दरवाढीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ धर्माबादेत सोमवारी पेट्रोलचा दर ९२़१९ रुपये तर डिझेल ८२़८९ रुपये प्रति लिटर दराने विक्री केले जात होते़ त्या खालोखाल उमरीचा क्रमांक लागतो़गत सव्वा महिन्यात नांदेडात पेट्रोल तब्बल सहा रुपयांनी वाढले आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे़ दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ सुरु असून येत्या काही दिवसात पेट्रोल शंभरी गाठेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ १ आॅगस्टला नांदेड शहरात पेट्रोलचा दर ८५़२८ पैसे तर डिझेल ७२़३९ पैसे प्रति लिटर होते़१५ आॅगस्टला त्यामध्ये वाढ होवून पेट्रोल ८६़१८, डिझेल ७३़४१ पैशावर गेले होते़ ७ सप्टेंबरला पेट्रोल ८८़९७ तर डिझेल ७६़८८ पैसे होते़ १४ सप्टेंबरला पेट्रोल ९०़२३, डिझेल ७८़१५ पैसे लिटर होते़ राज्यात परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल-डिझेल मिळत असल्याचे बोलल्या जात होते़ परंतु परभणीपेक्षाही धर्माबाद आणि उमरी येथे अधिक दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्यात येत आहे़ सोमवारी परभणीत पेट्रोल ९१़२८ पैसे तर डिझेल ७८़९० पैसे प्रति लिटर होते़तर धर्माबादमध्ये पेट्रोल ९२़१९, डिझेल ८२़८९ रुपये प्रति लिटर होते़ म्हणजेच परभणीपेक्षा पेट्रोल जवळपास एक रुपया तर डिझेल तब्बल चार रुपयांनी महाग विकल्या जात होते़ तर उमरीमध्ये पेट्रोल ९१़८९ पैसे तर डिझेल ७९़४९ पैसे प्रति लिटर होते़ त्यामुळे परभणीपेक्षा धर्माबाद आणि उमरी येथे इंधनाचे दर जास्त आहेत़तर नांदेडात सोमवारी पेट्रोल ९१ रुपये व डिझेल ७८़६५ पैसे प्रति लिटर होते़ येत्या काही दिवसात पेट्रोल शंभरी गाठणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे़ साधारणता जुलै महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती़ १२ आणि १३ सप्टेंबर असे दोन दिवस दर स्थिर होते़ त्यानंतर पुन्हा एकदा दरवाढीस सुरुवात झाली़इंधनासाठी नागरिकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत़ खाजगी वाहतुकीचे दरही वाढविण्यात आले आहेत़ त्यामुळे जीवनाश्यक वस्तुच्या वाहतुकीच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे़ सध्या तरी, इंधन दरवाढीपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून सर्वसामान्यांमधून मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़मनमाडहून होतो धर्माबादला इंधन पुरवठानांदेड जिल्ह्यात सोलापूर, मनमाड आणि अकोला या तीन ठिकाणाहून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात येतो़ नांदेड शहरात सोलापूरहून तर धर्माबाद, उमरी, कारेगांव आदी भागांना मनमाडहून पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्यात येतो़ त्यामुळे नांदेडपेक्षाही धर्माबाद, उमरी येथील पेट्रोल आणि डिझेलचे दर अधिक आहेत़ मनमाड ते धर्माबाद आणि उमरीचे अंतर परभणीपेक्षा जास्त आहे़ त्यात शेजारील तेलंगणामध्ये मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी असल्याची माहिती हाती आली आहे़दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेइंधन दरवाढीपासून सध्या तरी, सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे़ त्यात भाजीपाल्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत़ गॅस सिलेंडरमध्येही दरवाढ झाली आहे़ खाजगी वाहतुकदारांनीही तिकीट दरात वाढ केली़ यासोबतच जीवनाश्यक वस्तुचे दर आवाक्याच्या बाहेर गेल्याने बजेट कोलमडले आहे़

टॅग्स :NandedनांदेडPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप