नांदेड- शहरातील केळी मार्केट भागात वाहनात झाेपलेल्या एका चालकाचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली. भिमाशंकर लक्ष्मण स्वामी रा.शिरडशहापूर हे माल घेवून केळी मार्केट येथे आले होते. या ठिकाणी वाहन उभे करुन ते झोपले होते. चोरट्याने यावेळी त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.
तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ
नांदेड- देगलूर तालुक्यातील लिंबा येथ पैशाची मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. पिडीतेला व्यवसाय करण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये घेवून येण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी पिडीतेला मारहाण करुन घराबाहेर हाकलण्यात आले. त्यानंतर परस्पर पतीचे दुसरे लग्न लावून देण्यात आले. या प्रकरणात देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खंजर घेवून फिरणारा आरोपी अटकेत
नांदेड- अर्धापूर शहरातील एका पेट्रोल पंपाजवळ खंजर आणि चाकू घेवून फिरणार्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. २१ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपी हा नासेर खान यांच्या पेट्रोल पंपाशेजारी एका पंक्चरच्या दुकानात थांबला होता. यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणात अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.