शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मनरेगा गैरव्यवहार; ४४ लाख वसूल

By admin | Updated: May 8, 2014 15:51 IST

जिल्ह्यात २0१0-११ आणि २0११-१२ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा परिषदेने आतापर्यंत तब्बल ४४ लाख ५0 हजार ३९७ रूपयांची वसुली केली आहे.

मजुरांची संख्या जास्त दाखविणे, चुकीच्या नोंदीनांदेड : जिल्ह्यात २0१0-११ आणि २0११-१२ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा परिषदेने आतापर्यंत तब्बल ४४ लाख ५0 हजार ३९७ रूपयांची वसुली केली आहे. याच प्रकरणात दोषी आढळलेल्या उपअंभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकार्‍यांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.मनरेगाअंतर्गत उपरोक्त कालावधीत झालेल्या कामांची जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेल्या पथकांकडून पाहणी झाल्यानंतर जवळपास २७ गावांमध्ये गैरप्रकार झाल्याची बाब उघडकीस आली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेने यासंदर्भात दोषी असणार्‍या पॅनल तांत्रिक अधिकार्‍यांना सेवामुक्त करण्याची कारवाई केली आहे.त्यामध्ये लोहा तालुक्यातील मंगनाळे, मुखेड तालुक्यातील जुन्ना, शिरूर येथील गैरप्रकारप्रकरणी लक्ष्मीकांत लुंगारे, कोळनूर, जांभळी, उमरदरी येथील प्रकरणात यु.आर. मस्कले, बार्‍हाळी प्रकरणातील डी.के. सूर्यवंशी, चोैडी- एस.पी. रातोळीकर आणि बेरळी खु. व बु. प्रकरणातील गैरव्यवहारप्रकरणात पॅनल तांत्रिक अधिकारी आर.एस. वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे.त्याचवेळी चौकशीत गैरव्यवहार आढळलेल्या कामांची किंमतही चौकशी पथकाने निश्‍चित केली. यातील उमरदरी, होनवडज, कोळनूर आणि चिवळी येथील गैरव्यवहारप्रकरणात ४४ लाख ५0 हजार ३९७ रूपये ही रक्कम संबंधित यंत्रणेकडून वसूल करण्यात आली आहे. ही वसुली काम करणार्‍या यंत्रणांकडून केली आहे. त्यात ग्रामपंचायतीसह अन्य विभागांचाही समावेश आहे.याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील कामावर झालेल्या गैरव्यवहारप्रकरणातील अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यात मुखेड तालुक्यातील जुन्ना, शिरूर, बिल्लाळी येथील गैरव्यवहार प्रकरणात उपअभियंता ए.व्ही. डावकरे, व्ही.व्ही. शिंगणवाड, शाखा अभियंता एस.जी. इंगळे, एम.एन. भोसले, बार्‍हाळी - शाखा अभियंता एस. जी. इंगळे, जाहूर - शाखा अभियंता पी.पी. गायकवाड, उमरदरी - शाखा अभियंता एम.एन. भोसले, बेरळी, राजुरा बु., आंबुलगा - उपअभियंता ए.व्ही. डावकरे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.तर लोहा तालुक्यातील पार्डी येथील गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ अभियंता ए. एच. पवार, कंधार तालुक्यातील धानोरा, राऊतखेडा गैरव्यवहार प्रकरणात डी.व्ही. बस्वदे, नायगाव तालुक्यातील नावंदी, कांडाळा, भोकसदरा प्रकरणात शाखा अभियंता अब्दुल समद, कोठाळा - रत्नपारखी आणि माहूर तालुक्यातील मालवाडा गैरव्यवहारप्रकरणी शाखा अभियंता जी.एफ. आडे यांना दोषी ठरवले आहे.याचप्रकरणात ग्रामसेवक पी. केचाडीकर, एस.टी. गोरे, एस.एस. पाटील, एस.व्ही. पंदलवाड, आर. एल. मंदेवाड, एस. व्ही. भाडेकर, एस.जी. शिंदे, एम.एम. हाळदेवाड, आर.के. बारूळकर, पी.के. वाडीकर, एस.व्ही. भाडेकर, एस.एम. शेखे, एस. के. पाणपटे, एम.के. माकणे, एस.व्ही. थोटे, इ.डी. मुंडे आणि एस.बी. शिंदे यांना चौकशीदरम्यान अभिलेखे उपलब्ध करून न देणे, चुकीचे माहिती देणे यासंबंधी जबाबदार धरले आहे.मनरेगांतर्गत कृषीची कामेही झाली आहेत. त्यात गैरव्यवहार केल्याचा ठपका कृषी अधिकारी - कृषी विस्तार अधिकारी व्ही.व्ही. चव्हाण, एस. आर. पांचाळ आणि ए.व्ही. आचलवाड यांच्यावर ठपका ठेवला आहे.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बांधकाम विभागाकडे संबंधित अभियंत्यांची तसेच कृषी विभागाकडे कृषी अधिकार्‍यांची नावे सोपविली आहे. त्यांच्यावरील दोषारोप निश्‍चित करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)■ या योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या कामावर आवश्यकतेपेक्षा जास्त मजुरांची संख्या दाखवणे, रोपवाटिका कामात चुकीचे मोजमाप नोंदविणे, पौळाचे दगड टाकण्याची बाब अंदाजपत्रकात नमूद नसताना चुकीचे मोजमाप दाखविले आदी बाबी चौकशीत पुढे आल्या आहेत.■ठपका ठेवलेल्या अधिकार्‍यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवून कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले आहे. मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात विद्यमान जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या मुखेड तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. मजुरांची संख्या जास्त दाखविणे, चुकीच्या नोंदी