शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरातील ७ हजार मतदारांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:00 IST

बीएलओमार्फत घरोघरी भेटी देवून मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ३ हजार ८८० तर नांदेड दक्षिण मतदारसंघातील ३ हजार २६ मतदार स्थलांतरित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देयादीतून वगळण्यात येणार नावे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : बीएलओमार्फत घरोघरी भेटी देवून मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ३ हजार ८८० तर नांदेड दक्षिण मतदारसंघातील ३ हजार २६ मतदार स्थलांतरित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ज्या मतदारांचा या मोहिमेवेळी शोध लागला नाही अशा मतदारांना सामूहिक सूचना देवून त्यानंतरही आक्षेप प्राप्त न झाल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.निवडणूक विभागाच्या वतीने सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. शहरातील उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार संघात बीएलओमार्फत यासाठी १५ मे ते २१ जून या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत घरोघरी भेटी देण्यात आल्या. यादीवर असलेले मतदार पत्यावर आढळून आले नाहीत त्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली. ही यादी संबंधित तलाठ्यामार्फत त्या त्या भागात प्रसिद्ध करण्यात आली असून नांदेड जिल्हा संकेतस्थळावरही ती टाकण्यात आली आहे.ज्या मतदारानांना बीएलओ या मोहिमेत शोधू शकले नाहीत, अशा मतदारांना सामूहिक जाहीर सूचनेद्वारे अंतिम संधीची नोटीस देवून त्यांचे आक्षेप प्राप्त न झाल्यास त्यांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी कळविले आहे.----जिल्ह्यात २९ हजार १११ मतदारांना रंगीत ओळखपत्रजिल्ह्यात निवडणूक विभागाचे ओळखपत्र आधुनिक करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. मतदार यादीतील ज्या मतदारांचे १६ अंकी ओळखपत्र आहे व सदर मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र आहे असे जिल्ह्यात २ लाख ८५ हजार ४९१ मतदार आहेत. या ओळखपत्राचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत निवडणूक विभागाकडे १ लाख १६ हजार ६८३ मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र दिले आहेत. त्यानुसार डाटा एन्ट्री करण्यात आलेल्या मतदारांची संख्या ७६ हजार ७४५ आहे तर अंतिम अपडेट झालेल्या मतदारांची संख्या ६४ हजार ३२० इतकी आहे. निवडणूक विभागाने आतापर्यंत २९ हजार १११ मतदारांना रंगीत ओळखपत्र दिले आहेत.---रंगीत ओळखपत्रासाठी मतदारांनी आपला रंगीत पासपोर्ट बुथलेवल आॅफिसर अर्थात बीएलओकडे द्यावा किंवा नॅशनल वोटर सर्व्हीस पोर्टल या संकेतस्थळावर मतदारालाही आॅनलाईन फोटो अपलोड करता येणार आहे. त्यानंतर नवीन पीव्हीसी इपिक कार्ड मतदारांना मिळणार आहे. या प्रक्रियेत मतदारांच्या नावाची वगळणी होणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूक