शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नशेखोरांच्या हाती आता मेफेनटरमीनचे इंजेक्शन; रुग्णालयात जबरदस्ती होतेय मागणी

By शिवराज बिचेवार | Updated: August 18, 2023 18:24 IST

बाजारात सहज उपलब्ध असलेल्या कॅफेनची मात्रा असलेल्या सॉफ्ट ड्रिंकचा लहान मुलेही नशेसाठी वापर करीत आहेत.

नांदेड- बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक औषधी तसेच कॅफेनची मात्रा असलेली सॉफ्ट ड्रिंकचा वापर नशेसाठी सर्रास करण्यात येत आहे. परंतु आता ब्लडप्रेशर वाढविण्यासाठी वापरण्यात येणार्या मेफेनटरमीन या इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या मैदानी खेळात आपला परफॉरमन्स वाढविण्यासाठी खेळाडूही त्याच्या आहारी गेले आहेत. काही तर चक्क या इंजेक्शनसाठी खाजगी रुग्णालयाला तगादा लावत आहेत. याबाबत काही डॉक्टरांनी तक्रारीही केल्या आहेत.

बाजारात सहज उपलब्ध असलेल्या कॅफेनची मात्रा असलेल्या सॉफ्ट ड्रिंकचा लहान मुलेही नशेसाठी वापर करीत आहेत. एकाच दिवशी साधारणता दोन ते तीन लिटर सॉफ्ट ड्रिंक घेतल्यानंतर अशा व्यक्तीची झोप उडते. परंतु मेंदू अलर्ट राहतो. परंतु अशाप्रकारच्या ड्रिंकच्या विक्रीवर कोणाचेही निर्बंध नाही. त्यातच आता एखाद्या रुग्णाचे ब्लडप्रेशर कमी असेल तर अशा रुग्णांना मेफेनटरमीन हे इंजेक्शन दिले होते. त्याच इंजेक्शनच्या नशेची काही जणांना सवय लागली आहे. जीम मध्ये अनेक तास व्यायाम करताना थकवा येवू नये, मैदानी खेळांमध्ये आपला परफॉरमन्स वाढवा या उद्देशानेही काही जण हे इंजेक्शन घेत आहेत. हे एक प्रकारचे उत्तेजक औषध आहे. परंतु त्याचा नशेसाठी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे ह्दयाचे ठोके वाढून अचानक स्ट्रोक येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नशेबाज वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून रुग्णालये गाठत आहेत. हा प्रकार अनेक डॉक्टरांच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे डॉक्टरांनीही आता तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.

मेफेनटरमीनच्या वापरात झाली वाढबाजारात कॅफेनयुक्त सॉफ्ट ड्रिंकची अनेकजण नशा करीत आहेत. दररोज असे रुग्ण येत आहेत. त्यातच मेफेनटरमीनच्या इंजेक्शनचाही उत्तेजक म्हणून काही जण वापर करीत आहेत. नुकतेच तसा एक रुग्ण आला होता. परंतु या इंजेक्शनच्या वापरामुळे ह्दयाचे ठोके वाढतात. त्यामुळे स्ट्रोक होवून मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता अधिक आहे. - डॉ.रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Drugsअमली पदार्थNandedनांदेड