शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदारकीचा राजीनामाही देऊ : संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 15:37 IST

Maratha Reservation : खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवाराजे काय भूमिका घेणार याकडे संबंध समाजाचे लक्ष लागले आहे.

- श्रीनिवास भोसले

नांदेड : माझा राजीनामा देऊन मराठा  समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न  सुटणार असेल, समाजाला न्याय मिळत असेल तर मी खासदारकीचा राजीनामा देईन, असे आक्रमक मत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वांनी जातीय आणि पक्षीय भेदभाव सारून एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. ते मंगळवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान, शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी, कायदेतज्ज्ञ आणि आरक्षण अभ्यासक यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार संभाजीराजे म्हणाले, आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा लढा उभा करण्याची गरज आहे. परंतु, हा लढा कार्यकर्त्यांनी नाही तर त्यांनी निवडून दिलेल्या आमदार, खासदार यांनी उभा करण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणं हा एक भाग आहे. पण त्यासोबतच इतर पर्यायी मार्ग काय आहेत हे शोधण्यासाठी हा दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो याचा अभ्यास या दौऱ्यादरम्यान करणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितले. कोरोना काळात जनतेने रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, आपण केंद्र आणि राज्य सरकारमधील प्रमुख नेत्याना भेटून आरक्षणप्रश्नी चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर आपण काय ती भूमिका माध्यमासमोर 27 किंवा 28 मे रोजी मांडणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

राजे काय भूमिका घेणार याकडे संबंध समाजाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा समाजाचे नुकसान होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना करता येतील? सारथीचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल, शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह आदींबाबत काही धोरण निश्चित करता येईल का, असे अनेक मार्ग आणि पर्याय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चिले जाणार आहेत, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर सडकून टीका करत अशा लेखकांना महाराष्ट्रात फिरकू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी दौरा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून या दौऱ्याला कोल्हापूर इथून सुरुवात झाली कोल्हापूर-पंढरपूर-सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-नांदेड असा त्यांचा दौरा झाला आहे. पुढे ते जालना, औरंगाबाद असा दौरा करणार आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचं बोललं जातंय.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीNandedनांदेड