शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ग्रामपंचायतींना दिव्यांगाचा निधी वाटप करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

दिव्यांग व्यक्तींसाठी २०१२ पासून महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामसेवक दिव्यांगाना जाणूनबूजून ...

दिव्यांग व्यक्तींसाठी २०१२ पासून महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामसेवक दिव्यांगाना जाणूनबूजून निधी वाटप करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे यातील अनेक ग्रामपंचायतीने २०१२ पासून आजपर्यंत एकवेळ ही निधी वाटप केला नाही असे सांगण्यात आले या आर्थिक वर्षात तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त निधी वाटप करणे गरजेचे होते. आणि ग्रामपंचायतीमध्ये अपंगांची नोंदणी करण्याचा कायदा असूनही त्याची तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतीत अंमलबजावणी केली जात नसल्याचे सांगितले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन परिस्थितीत अपंगाचे सध्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण सुरू आहे. असे असताना ग्रामपंचायतींनी राखीव निधीतून वाटप करण्याची मागणी दिव्यांग नागरिक ग्रामपंचायतकडे करीत आहेत हिमायतनगर तालुक्यात ५२ ग्रामपंचायत अस्तित्वात असून यातील कामारी, सरसम, पोटा,सिरंजनी,पवना,सवना,सोनारी,वारंगटाकळी,पारवा,आदी मोठ्या ग्रामपंचायत असून ५२ पैकी अर्ध्याहून अधिक ग्रामपंचायतीने अपंगांना निधीचे वाटप केले नसल्याचे सांगितले जाते या संदर्भात कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सुधीस मांजरमकर हे निधी वाटप केली नाही अशा ग्रामपंचायतीवर व अधिकारी यांच्यावर काय कार्यवाही करतील आणि अपंगांना न्याय देतील अशी आशा लाभार्थी बाळगून आहेत.