शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

किनवट येथे महा आरोग्य तपासनी शिबीर, १२०० डॉक्टर तपासणार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:50 IST

नांदेड : किनवट येथील ग्रामीण महाआरोग्य शिबिरात ९२ बाह्यरुग्ण विभाग स्थापन करण्यात येणार असून रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.आतापर्यंत जवळपास १७ हजार रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

ठळक मुद्देआढावा बैठक: जिल्हाधिकाºयांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : किनवट येथील ग्रामीण महाआरोग्य शिबिरात ९२ बाह्यरुग्ण विभाग स्थापन करण्यात येणार असून रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.आतापर्यंत जवळपास १७ हजार रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सर्व शासकीय समिती प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहा. जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. डोंगरे म्हणाले, रुग्णांना या शिबिरात चांगली सेवा देण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे. रुग्णांना शिबीरस्थळी आणण्याचे व परत पोहोचविण्यासाठी वाहन व्यवस्थाही करण्यात आली आहे. नावनोंदणी, पाणीपुरवठा, अवयवदान, अपातकालीन परिस्थिती, औषधीपुरवठा, जनजागृती आदी बाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून बाह्यरुग्ण विभाग सुरु होणार आहे. या शिबिरात जवळपास ५ हजार स्वयंसेवक कार्यरत राहतील. नांदेड येथील श्री सचखंड गुरूद्वाराच्या वतीने रुग्ण, डॉक्टर, स्वयंसेवकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जैन ठिबक यांच्या वतीने केळी, फिनोलेक्स आणि मायलॉन कंपनीमार्फत औषधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे व जळगाव येथील स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मंडप उभारणीचे काम केले आहे.चार ट्रक औषधीसाठा उपलब्धकिनवट येथे होणाºया महाआरोग्य शिबिरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर, भोकर या पाच तालुक्यांतील गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. १२०० तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरास राज्यभरातून येणार आहेत. त्यामध्ये २०० आंतराष्ट्रीयख्यातीचे डॉक्टर आहेत. या शिबिरासाठी जवळपास चार ट्रक औषधीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. रोगानुसार वर्गवारी करुन येथे ८० मेडिकल उभारले जाणार आहेत.