शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

ऑनलाईन खरेदी मालावर करडी नजर

By admin | Updated: February 13, 2015 15:08 IST

नविन आयुक्त सुशिल खोडवेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तिसर्‍याच दिवशी एलबीटी वसुलीसाठी ऑनलाईन खरेदीचा माल जप्त करण्याच्या सूचना स्थानिक संस्था कर विभागाला दिल्या.

नांदेड: राज्यात एलबीटी वसुलीचा पॅटर्न निर्माण करणार्‍या नांदेड महापालिकेने आता ऑनलाईन खरेदीच्या मालावर लक्ष केंद्रीत केले आहे. नविन आयुक्त सुशिल खोडवेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तिसर्‍याच दिवशी एलबीटी वसुलीसाठी ऑनलाईन खरेदीचा माल जप्त करण्याच्या सूचना स्थानिक संस्था कर विभागाला दिल्या. त्यानुसार सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्या पथकाला १ कोटी १३ लाख ८९ हजार रूपयांचा माल जानेवारीमध्ये आयात झाल्याचे आढळून आले. या नव्या कारवाईमुळे ऑनलाईन व्यवहार करणार्‍या व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. मनपा आयुक्त खोडवेकर यांनी १0 फेब्रुवारी रोजी रूजू झाल्यानंतर स्थानिक संस्था करा संदर्भात सहायक आयुक्त सादेक यांच्याशी चर्चा केली. शहरात ऑनलाईन खरेदीवर आयात होणार्‍या मालावर (उदा. लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरे आदी मौल्यवान वस्तू) स्थानिक संस्था कर न भरणारे कुरिअर व व्यवसाय करणार्‍या कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. संबंधित कंपन्यांनी स्थानिक संस्था कराची नोंदणी न करता व स्थानिक संस्था कराचा भरणा न केल्यामुळे दोन्ही दुकानातील माल जप्त करण्यात आला. दोन्ही कंपनीला त्वरीत एलबीटी कर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ७ दिवसात कराचा भरणा न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गुलाम सादेक, क्षेत्रिय अधिकारी एम. व्ही. सोळंके, शफीक अहेमद, टी. डी. पाटील, वहिदु जमा, गिरीष काठीकर यांनी सहभाग घेतला. मनपाने मागील तीन महिन्यात एलबीटी थकीत असलेल्या साडेचारशे व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली. जानेवारी अखेर एलबीटी विभागाने ४६ कोटी ६७ लाख ८१ हजार ४७२ रूपये वसूल केले आहेत. /(प्रतिनिधी)

१ कोटी १३ लाखांचा माल जप्तस्थानिक संस्था कर विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी डिलेव्हरी कुरिअर व ब्ल्यू डॉट कॉम कुरिअर या दुकानांची तपासणी केली. तेव्हा डिलेव्हरी कुरिअरवर जानेवारी महिन्यात १ कोटी १३ लाख ८९ हजार ३८३ चा माल आयात झालेला आढळून आला.

--------------

जगभरात ऑनलाईनद्वारे मालांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. देशात मुंबई, गुडगाव, ठाणे आदी मोठे शहरे अशा वस्तुंच्या आयात, निर्यातीचे केंद्र आहेत. ग्राहकांना ऑनलाईनद्वारे एखादी वस्तु पाठविल्यानंतर संबंधित शहरात त्या वस्तुचे अधिकृत वितरक असतात. महापालिका हद्दीत वितरक व ग्राहक या दोघांचेही वास्तव्य असते. त्यामुळे संबंधित वितरकाचे प्रतिनिधी घेऊन कुरिअरच्या ठिकाणी या वस्तुंच्या उलाढालीची माहिती घेण्यात येत आहे.औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर नांदेड महापालिकेच्या वतीने ऑनलाईन मालांच्या खरेदी - विक्रीवर अंकुश ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्यवहार किती होतो, याची माहिती मिळेल. ऑनलाईन वस्तुंच्या एलबीटी संदर्भात केंद्र व राज्य शासनाचे ठळक धोरण अद्याप निश्‍चित झाले नाही. मात्र स्थानिक संस्था कर अधिनियमातंर्गत हा कर बुडविणार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. - सुशील खोडवेकर, आयुक्त