शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या रोहीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:31 IST

अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकास विहिरीत पडलेल्या रोहीच्या एक वर्षीय पिल्ल्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना पिल्लू विहिरीत पडले होते. ही घटना १४ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान अंबाडी शिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या पथकास विहिरीत पडलेल्या रोहीच्या एक वर्षीय पिल्ल्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना पिल्लू विहिरीत पडले होते. ही घटना १४ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान अंबाडी शिवारात घडली.अत्यल्प पाऊस पडल्याने जंगल शिवारात पशू, पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले. परिणामी पाण्याच्या शोधार्थ प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. रोहीच्या पिल्लाबाबतही असेच घडले. १३ मार्च रोजी एक वर्षीय पिल्लू पाण्याच्या शोधार्थ अंबाडी शिवारातील शेत सर्व्हे २२७ मधील गंगूबाई संदूलवार यांच्या शेतात पोहोचले. पहाटे ५ वाजेच्या दरम्यान विहिरीत पिल्लू पडले असावे. सकाळी नेहमीप्रमाणे व्यंकटी संदूलवार शेतात गेले असता, विहिरीतील पिल्लू त्यांच्या दृष्टीस पडले. विहिरीतील पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करुन घटनेची माहिती बीटच्या वनरक्षक मिमीरा टोंपे यांना दिली.सहाय्यक वनसंरक्षक डॉ़ राजेंद्र नाळे, वनपरिक्षेत्राधिकारी के़एऩ कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाडी बिटाचे वनपाल शेख फरीद, वन्यजीव विभागाचे वनपाल एस़बी़ सालमेटी, वनरक्षक मीरा टोंपे, वनरक्षक आरक़े़ साबणे, जी़बी़ ढवरे, कोमल मºहसकोल्हे, चालक अनिल लखाडे, भगवान वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने बाजेच्या सहाय्याने पिल्लाला विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर जाळीच्या सहाय्याने अवघ्या १५ मिनिटांतच म्हणजे सकाळी ९.३० च्या दरम्यान बाहेर काढून त्याच्यावर पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत उपचार करून भीमपूर पठारावर जंगलाच्या दिशेने सोडून दिले़ जिवाच्या आकांताने जंगलाच्या दिशेने व रोहीच्या कळपाच्या दिशेने पिल्लाने धूम ठोकली़ किनवट तालुक्यातील जंगलात पानवठ्याची सोय नसल्याने प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.शासनाकडून पानवठ्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे समजते. यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करुन निधीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत वनप्रेमींनी व्यक्त केले.