शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नववीत शाळा नको म्हणून घर सोडले, 'बीए' ला प्रवेश घेताच आधारसाठी फोन केला अन सापडला

By शिवराज बिचेवार | Updated: September 20, 2022 18:35 IST

घरचे शाळेत पाठवत असल्याने पळालेला ज्ञानेश्वर हा औरंगाबाद येथे गेला होता.

नांदेड : आई-वडील शाळेत जाण्याचा तगादा लावत असल्याने इयत्ता नववीतील मुलाने घर सोडले. जवळपास साडेचार वर्षांपासून तो बेपत्ता होता. परंतु, याच काळात कोणत्याही वाईट वळणाला न लागता त्याने बी. ए.पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरी वडिलांना आलेल्या एका निनावी फोनवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या मुलाचा शोध लावला. मुलाला समोर पाहताच आई-वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

नागोबा ज्ञानोबा पेद्दे (रा. भोसी, ता. बिलोली) यांचा मुलगा ज्ञानेश्वर याला शाळेत जाण्याचा कंटाळा होता. नववीत असताना शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडायचा अन् गावभर फिरायचा. ही बाब नागोबा पेद्दे यांना कळल्यानंतर त्यांनी शाळा गाठली. परंतु, वडिलांना समोर पाहताच ज्ञानेश्वरने धूम ठोकली. तो घरी परत आलाच नाही. पेद्दे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. परंतु, त्याचा शोध लागत नव्हता. ही घटना १६ मार्च २०१८ रोजी घडली. परंतु, दोन दिवसांपूर्वीच पेद्दे यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच त्या क्रमांकावर संपर्क साधून लोकेशन काढले. 

सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या ज्ञानेश्वरला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आघाव यांनी बोलते केले. तो बेपत्ता झाल्यापासून त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली, हे पटवून दिले. त्यालाही आघाव यांचे म्हणणे पटले. त्यानंतर औरंगाबाद येथून ज्ञानेश्वरला आणण्यात आले. मंगळवारी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, पोनि. द्वारकादास चिखलीकर यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. यावेळी आई-वडील आणि ज्ञानेश्वर या तिघांनी एकमेकांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

आधारकार्डसाठी केला होता फोनज्ञानेश्वर याने घरातून बाहेर पडल्यानंतर साडेचार वर्षांत घरी एकदाही संपर्क केला नाही. परंतु, एका कामासाठी त्याला आधारकार्डची गरज होती. त्यासाठी वडिलांना अनोळखी क्रमांकावर कॉल केला अन् पोलिसांनी त्यावरून त्याचा काैशल्यपूर्णरित्या शोध घेतला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आघाव यांनी ज्ञानेश्वरला विश्वासात घेऊन त्याची माहिती मिळवली.

शाळा नको म्हणून पळाला अन् बी. ए. झालाघरचे शाळेत पाठवत असल्याने पळालेला ज्ञानेश्वर हा औरंगाबाद येथे गेला होता. याठिकाणी मात्र त्याला शिक्षण सोडल्याचा पश्चाताप झाला. येथे हाती पडेल ते काम करून त्याने मुक्त विद्यापीठातून बी. ए. प्रथम वर्षापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता मात्र पुढील शिक्षण तो नांदेडलाच घेणार आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडEducation Sectorशिक्षण क्षेत्र