शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

डिक्कीतून पैसे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST

मोबाईल केला परत उमरी - रस्त्यावर सापडलेला १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल शिक्षकास परत करण्यात आला. ही घटना ६ ...

मोबाईल केला परत

उमरी - रस्त्यावर सापडलेला १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल शिक्षकास परत करण्यात आला. ही घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी घडली. राम परदेसी हे उमरी ते गोरठा रस्त्याने मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला. याचदरम्यान शिक्षक पंतोजी बालाजीराव, गोविंदराव उप्परवार, प्रदीप जोंधळे, शंकरराव खांडरे, भिसे, बळीराम जाधव आदीही मॉर्निंग करीत असताना त्यांना हा मोबाईल मिळाला. परदेशी यांनी हरवलेल्या मोबाईलवर संपर्क केला. तेव्हा पंतोजी यांनी हा मोबाईल आपल्याकडे असल्याचे सांगून मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले.

शेवाळे प्रथम

नरसी फाटा - विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या बी.जे. परीक्षेत भगवान शेवाळे हा विशेष प्रावीण्यासह प्रथम आला. रविराज लोखंडे हा द्वितीय तर सतीश आलेवार हा तृतीय आला. भगवान हा श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

अध्यक्षपदी केराम

किनवट - प्रकल्पस्तरीय नियोजन व मूल्यमापन समितीच्या अध्यक्षपदी आ.भीमराव केराम यांची नियुक्ती झाली. आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील योजनांचा व प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली. प्रकल्प अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केराम यांना नियुक्तीपत्र दिले.

बसची मागणी

धर्माबाद - धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथे धर्माबाद-नरसी, धर्माबाद-नांदेड-मुदखेड अशी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. जारीकोट येथील प्रवासी अशोक रामोड, रमेश मुळे, कांतराव रामाेड, हनुमंत मुदलोड, दत्तात्रय मुपडे, मारोती यडपलवार, सतीश स्वामी आदींनी ही मागणी केली.

आंदोलनाला प्रतिसाद

इस्लापूर - अखिल भारतीय किसान सभा किनवट समितीच्या वतीने कृषी विधेयकाच्या विरोधात इस्लापूर येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवाजी घोगरे, प्रकाश वानखेडे, प्रकाश राठोड, मनोज राठोड, खंडेराय कानडे, अनुप देशमुख, शेषराव ढोले, जगदीश हनवते, दत्ता गडलवार, गौरव कदम आदी उपस्थित होते.

पोषण आहाराचे वाटप

किनवट - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारखणी येथील शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप मुख्याध्यापक आर.बी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहशिक्षिका जे.बी.मुनेश्वर, एस.व्ही.वळसंगकर आदी उपस्थित होते. शाळेतील सर्व मुलांना याचा लाभ झाल्याचे पवार यांनी सांगितले.

वृक्षांची केली पाहणी

मुखेड - येथील पालिका कार्यालयाच्या समोरील मैदानात काही दिवसापूर्वी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, मुख्याधिकारी विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले होते. या वृक्षांची दोघांनीही पाहणी केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे सागर पडोळकर, अभियंता ज्ञानदेव गुट्टे, बलभीम शेंडगे, गौरव जाधव, गौतम गवळे आदी उपस्थित होते.