देगलूर तालुक्यातील हनेगाव येथे संजीवकुमार काशिनाथ आचारे यांनी आपल्या घरातील कपाटात शेती घेण्यासाठी २५ लाख रुपये ठेवले होते. तसेच त्या कपाटात सोन्या-चांदीचे दागिनेही होते. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास चोरट्यांनी हे रोख २५ लाख आणि संजीवकुमार यांच्या पत्नीचे ७३ तोळे सोन्याचे दागिने व काही चांदी लंपास केली. या प्रकरणात संजीवकुमार आचारे यांनी तक्रार दिली.
हे प्रकरण देगलूरच्या प्रथमवर्ग न्यायालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून सोनल संजीवकुमार आचारे, ईर्शाद मोहदीन आतार, गौस मोहदीन आतार, ईस्माईल मोहदीन आतार, मोहदीन अब्दुल आतार या पाच जणांविरुद्ध हनेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक बिरादार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.