शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

शौचालयाचा विसर; पाणंद रस्त्यावर घाण, अनेक शौचालयगृहे अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:57 IST

पाणंदमुक्त तालुका अशी हिमायतनगरची ओळख असली तरीही अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट झाली आहेत. आता तर नागरिकांना शौचालयांचा विसर पडला की काय? असे चित्र आहे़

ठळक मुद्देहिमायतनगर तालुक्याचे चित्र गटविकास अधिकारी म्हणाले, संबंधितांविरुद्ध कारवाई करुग्रामसेवकांचे कानावर हात

हिमायतनगर : पाणंदमुक्त तालुका अशी हिमायतनगरची ओळख असली तरीही अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट झाली आहेत. आता तर नागरिकांना शौचालयांचा विसर पडला की काय? असे चित्र आहे़हिमायतनगर तालुका पाणंदमुक्त होण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर यांनी प्रयत्न केले. तालुका पाणंदमुक्त झाला. संबंधित गावचे ग्रामसेवक, सरपंच यांनीही याकामी परिश्रम घेतले. १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत तालुका पाणंदमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. या तारखेपर्यंत शौचालयांची कामे झाल्याचे दर्शविण्यात आले.तालुक्यातील पवना, पवनातांडा, वाळकेवाडी, धन्वेवाडी, वडाचीवाडी, रामनगरसह अनेक गावांतील शौचालयांची कामे अर्धवट झाली. काही शौचालयांवर टीनपत्रे नाहीत, अनेक ठिकाणी शौच खड्डेच तयार नाहीत. त्यात रिंगाही नाहीत. यासंदर्भात पंचायत समितीकडे तक्रारी केल्या, मात्र दखल घेण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.नागरिकांंनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा, यासाठी जनजागृती व्हावी, म्हणून २ गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली होती.पथकाने अनेक गावांत पहाटे ५ वाजता भेटी देवून उघड्यावर बसणाऱ्यांना सुरुवातीला गांधीगिरी करुन फूल देत शौचालयाचे महत्त्व सांगितले. दुसºया भेटीत उघड्यावर बसाल तर पोलीस कारवाई करु, असा दम देण्यात आला. तालुक्यातील उपरोक्त गावातील ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांनी युद्धपातळीवर लाभार्थ्यांच्या सहकाºयाने शौचालय बांधकाम केले खरे, मात्र जवळपास २० टक्के शौचालयांची कामे अर्धवट ठेवण्यात आली. ती पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांंनी केला.आम्ही कामाचे मटेरियल दिले होते, ते आता चोरीला गेले आहे. हंगामी कामावर लाभार्थी गेल्याने कामे राहिली, असे वाळकेवाडीचे ग्रामसेवक शैलेश वडजकर यांनी सांगितले तर पवनाचे ग्रामसेवक बालाजी पोगूलवाड यांनी चार वेळा फोन घेण्याचे टाळले.सर्व बाजू तपासून संबंधितांवर निश्चित करवाई केली जाईल, कामे पूर्ण केली जातील, असे बीेडीओ सुदेश मांजरमकर यांनी यावर सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNanded zpनांदेड जिल्हा परिषद