शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

माहूर तीर्थक्षेत्र विकासापासून कोसोदूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:23 IST

महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरगडचा विकास इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत नगन्य झाला आहे. माहूर हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात येते. मराठवाड्यातून आतापर्यंत चार मुख्यमंत्री झाले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नादेड जिल्ह्यातील हे देवस्थान असून त्यांच्या काळात घोषित झालेल्या ७९ कोटीपैैकी केवळ २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. हे अपवाद वगळता माहूर तीर्थक्षेत्रसाठी चुटपूट निधीशिवाय काहीही मिळाले नाही. परिणामी हे तीर्थक्षेत्र आजही विकासापासून उपेक्षितच आहे.

ठळक मुद्देसाडेतीन पीठापैकी पूर्णपीठशासनाकडून जाहीर केलेला निधी गेला परतभरीव निधीसह अंमलबजावणीची गरज रस्त्यांच्या कामाला वनविभागाचा अडथळा

नितेश बनसोडे।श्रीक्षेत्र माहूर : युती शासनाच्या काळात माहूर तीर्थक्षेत्र विकासाकरिता १९९५ मध्ये तत्कालीन सार्वनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पण वनविभागाच्या जाचक अटीमुळे वन विभागाची जमीन विकास कामांसाठी उपलब्ध न झाल्याने सदरचा निधी विना उपयोग परत गेला.मराठवाड्याचे भगिरथ माजी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांची माहूर येथील रेणुकामातेवर श्रद्धा असल्याने या ठिकाणी अधून-मधून निधीची पूर्तता होत होती. शासनाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटनच्या तोडक्या निधीमुळे विकास शक्य नसल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापना केले़ भाविकांच्या मूलभूत सुविधा व गरजा लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात ७९ कोटींचा निधी अशोकराव चव्हाण यांनी घोषित केला. परंतु, प्रत्यक्षात विकासाकरिता २७ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यामध्ये माहूर टी पॉर्इंट, रेणुकादेवी, गरुड गंगा इथपर्यंतचा सिमेंट रस्ता व पूल, श्रीरेणुकादेवी संस्थानवर एक्स्प्रेस फिडरची उभारणी करण्यात आली. गरुडगंगा ते दत्तशीखर संस्थानपर्यंतचा तीन किमी रस्ता हा वनविभागाच्या अखत्यारित येत असल्याने रस्त्यासह विविध कामे प्राधिकरणास करता आली नाही. सा. बां. विभाग, वन विभाग, श्री रेणुकादेवी संस्थान, जिल्हाधिकारी कार्यालय यांची संयुक्तरित्या वन जमीन हस्तांतरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ४.०९ हेक्टर जमीन संपादित केली.सुधारित आराखडादरम्यान, फॉरट्रेस कंपनीने शासनाकडे निधीची मागणी केली. मात्र गेल्या सहा वर्षात निधी उपलब्ध न झाल्याने विकास आराखड्यामध्ये मंजूर असलेली कामे रखडली आहेत़ या सहा वर्षात ७९ कोटींचा विकास आराखडा २१६ कोटीवर पोहोचला २०१७ मध्ये सुधारित २१६ कोटीच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.या आराखड्यात मंदिराकडे जाणारे रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, वीज, पाणी, शौचालय, भक्त निवास आदी उभारण्यात येणार आहे. माहूरमध्ये येणाऱ्या भक्तांसाठी राहण्यासाठी योग्य व्यवस्था, शुभोभिकरण, बाजारपेठ, सौंदर्यीकरण, रामगड किल्ल्याची देखरेख, पर्यटनस्थळे, रस्ते, वीज त्या सोबतच पुरातन वास्तू संग्रहालय आदीचे जतन करणे आणि त्याची देखभाल करणे आदी कामे होणार आहेत़ माहूरसाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने कामे रेंगाळत पडली आहेत व विकासाचा अनुशेष भरुन निघाला नाही. माहूर परिसरातील बुद्धभूमी परिसर, सोनापीरबाबा दर्गा परिसर, श्री रेणुकादेवी मंदिर परिसर, दत्त शीखर, अनुसयामाता मंदिर परिसराचा माहूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश असून शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने विकासाला गती मिळालेली नाही. त्यामुळे भाविकातून नाराजी व्यक्त केली जात आहे़

माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने २१६ कोटी रुपयांचा निधी मंजूृर केला आहे़ आतापर्यंत २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यात सोनापीरबाबा दर्गा व अनुसयामाता मंदिर ते दत्तशीखर रस्ता, दत्त शीखर पायथा ते दत्तशीखर मंदिर रस्ता, दत्त शीखर परिसर, श्री रेणुकादेवी मंदिर परिसर, विकास कामासाठी ५५ कोटी रुपये निधीचे अंदाजपत्रक मंजुरीस सादर केले आहे़ वरिष्ठस्तरावरुन जसजसा निधी उपलब्ध होईल, त्याप्रमाणे कामे करण्यात येतील. - रवींद्र उमाळे (अभियंता, सा. बां. माहूर)

श्री रेणुकादेवी मंदिर परिसर विकासासाठी ६० कोटी रुपयांचे अंदाजपत्र पाठविले आहेत.शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने विविध विकासकामे रखडली आहेत. १६ कोटी रुपये लिफ्ट व ३९ कोटी रुपयाचा निधी रोपवेसाठी मंजूर झाला असून सदर कामे वर्षभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे़ शासनाने तिर्थक्षेत्र विकासासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून दिल्यास येथे येणाºया भाविकांना चांगल्या सुविधा देण्यास मदत होईल.  -बाळूभाऊ कान्नव, विश्वस्त, श्री रेणुकादेवी संस्थानशासनाने माहूर तीर्थक्षेत्रावर घोषणांचा पाऊस तर पाडला. सरकारने २१६ कोटींची दिलेली घोषणा ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ या वाक्प्रचारात जावून बसली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मार्चपासून एक वर्ष उलटून गेले. परंतु केवळ २ कोटी रुपये माहूर शहराला आले. त्यामुळे विकासाला गती मिळू शकली नाही. उर्वरित निधी या सरकारने त्वरित उपलब्ध करुन द्यावा व माहूर तीर्थक्षेत्राबरोबरच शहराच्या विकासालाही चालना द्यावी. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात कामे लवकर घेण्यासाठी सा. बां. विभागासोबत नगरपरिषदेला सुद्धा काम करण्यास देता यावे. माहूर नगरपरिषदेला एजन्सी दिल्यास कामांना गती मिळेल. दिगडी बंधाºयातून माहूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ७.५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहूरचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.                         -फिरोज दोसाणी, नगराध्यक्ष, माहूर

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळे