शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

उद्या पासून होणार माळेगावच्या खंडोबा यात्रेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 18:22 IST

देवस्वारीसह मंगळवारी होणार पालखी पूजन 

ठळक मुद्देचार दिवस भरगच्च कार्यक्रम ड्रोन कॅमेरातून राहणार यात्रेवर नजर

नांदेड : मराठवाड्यातील जनतेचे आराध्य दैवत असलेल्या माळेगाव येथील श्री म्हाळसाकांत तथा खंडोबा यात्रेस मंगळवारी २४ डिसेंबर रोजी देवस्वारी तथा पालखी पूजनाने प्रारंभ होत आहे़ २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली़ 

मंगळवारी सकाळी ११ वाजता श्री खंडोबाची पूजा होणार असून दुपारी २ वाजता देवस्वारी तथा पालखी पूजन आ़अशोक चव्हाण आणि माजी आ़ अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांची उपस्थिती राहणार असून यावेळी आ़श्यामसुंदर शिंदे, आ़मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे़ त्यानंतर ग्रामीण महिला व बालकांसाठी आयोजित स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालकल्याण सभापती मधुमती देशमुख यांच्या हस्ते होणार आहे़ तसेच दुपारी अडीच वाजता अशोक चव्हाण यांच्या हस्ते कृषि प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन व कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांची उपस्थिती राहणार आहे़ 

२५ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ९ वाजता समाजकल्याण सभापती शिलाताई निखाते यांच्या हस्ते विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे़ त्यानंतर सकाळी ११ वाजता आ़रावसाहेब अंतापूरकर यांच्या हस्ते पशू, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शनाचे उद्घाअन होणार आहे़ या कार्यक्रमाला कृषि व पशू संवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ 

२६ डिसेंबर रोजी गुरुवारी कै़दगडोजीराव देशमुख यांच्या स्मरणार्थ खंडोबा अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे़ सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे़ दुपारी २ वाजता कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन आ़श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांची उपस्थिती राहणार आहे़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव असतील़ 

२७ डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी १२़३० वाजता लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या महोत्सवाचे उद्घाटन खा़प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आ़अमरनाथ राजूरकर राहणार आहेत़ २८ डिसेंबर रोजी शनिवारी पारंपरिक लोककला महोत्सवाला सकाळी ८ वाजता प्रारंभ होईल़ याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आ़श्यामसुंदर शिंदे असतील़ दुपारी ४ वाजता बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे़ पशूसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल़ या कार्यक्रमालाही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह माळेगावचे सरपंच गोविंद राठोड, उपसरपंच सुंदरबाई धुळगंडे यांची उपस्थिती राहील़  

ड्रोन कॅमेरातून राहणार यात्रेवर नजरमाळेगाव यात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी जिल्हा परिषदेसह विविध यंत्रणांनी तयारी केली आहे़ यंदा या यात्रेसाठी दोन ड्रोन कॅमेरे तैनात असणार आहेत़ याबरोबरच विविध ठिकाणी फिरती शौचालये असणार आहेत़ भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यात्रा परिसरात चार वैद्यकीय पथकांसह सहा अ‍ॅम्बुलन्स तैनात ठेवण्यात येणार आहेत़ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही पथके भाविकांना आरोग्य सुविधा पुरवितील़ यात्रेसाठी येणाऱ्या पशूंच्या आरोग्यासंदर्भात सारंगखेडा यात्रा संयोजकांशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली आहे़ त्यानुसार पशूसंवर्धन विभागाकडून औषधी पुरवठा करण्यात येणार आहे़ यावेळी श्रेणी १ आणि २ च्या अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक पशूची तपासणीही केली जाणार आहे़ यात्रास्थळी लातूर आणि नांदेड महानगरपालिकेचा प्रत्येकी एक अग्नीशमन बंब तैनात असणार आहे़ 

ग्रामपंचायतीकडील अधिकार आता गटविकास अधिकाऱ्यांनायात्रेचे व्यापक नियोजन व्हावे यासाठी यात्रा नियोजनाचे ग्रामपंचायतीकडील अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून लोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत़ दरम्यान, ग्रामपंचायतीकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने येथील वीजपुरवठा खंडित होता़ त्यामुळे यात्रेत पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती़ मात्र जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला आहे़ त्यामुळे यात्रा कालावधीत ग्रामपंचायतीच्या नळ योजनेद्वारेच २४ तास पाणी पुरवठा सुरू राहणार आहे़ याबरोबरच जिल्हा परिषदेचे आठ पाणी टँकर दिमतीला राहणार आहेत़

टॅग्स :cultureसांस्कृतिकNandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद