शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

बीडीओच्या नोटिसीला ग्रामसेवकाने दाखविली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:03 IST

तालुक्यातील रिसनगाव येथे शौचालयगृह लाभार्थ्यांना धनादेश वाटप गैरव्यवहार, ग्रामसभा न घेणे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यास सहकार्य न करणे, चौदावा वित्त आयोग निधीची विल्हेवाट लावणे, गावात न येणे अशी लेखी तक्रार उपसरपंचासह पाच ग्रा.पं.सदस्यांनी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकाºयाने दिलेल्या अंतिम नोटिसीलाही ग्रामसेवकाने उत्तर न देता केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा : तालुक्यातील रिसनगाव येथे शौचालयगृह लाभार्थ्यांना धनादेश वाटप गैरव्यवहार, ग्रामसभा न घेणे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यास सहकार्य न करणे, चौदावा वित्त आयोग निधीची विल्हेवाट लावणे, गावात न येणे अशी लेखी तक्रार उपसरपंचासह पाच ग्रा.पं.सदस्यांनी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकाºयाने दिलेल्या अंतिम नोटिसीलाही ग्रामसेवकाने उत्तर न देता केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे.रिसनगावचे ग्रामसेवक व सरपंचांनी उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता चौदावा वित्त अयोगाच्या निधीची विल्हेवाट लावली. शौचालयगृह बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यास धनादेश देणे बंधनकारक असताना शासन आदेशाला धुडकावत ज्या लाभार्थ्याकडे एकच शौचालयगृह आहे त्यांना एकापेक्षा अधिक धनादेश वाटप करण्यात आले़ तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही व प्रस्तावसुद्धा नाही अशांना पात्र लाभार्थी बनवून त्यांना लाभाचा धनादेश खिरापतीप्रमाणे वाटप केले़ परिणामी खरे पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहिले असा आरोप निवेदनाद्वारे केला आहे.महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामपंचायत कार्यालय उघडलेच नाही. विशेष म्हणजे, रिसनगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकाºयांची भेट घेऊन गावाचा कारभाराचा पाढा वाचला असता गटविकास अधिकाºयांनी सदर ग्रामसेवकास २४ सप्टेंबर रोजी प्रथम नोटीस बजावली़ त्यास उत्तर न मिळाल्याने पुन्हा १ आक्टोबर रोजी अंतिम नोटीस पाठवली. परंतु, अद्याप ग्रामसेवकाने बीडीओंच्या नोटिसीला उत्तर दिले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली़सदर ग्रामसेवक व सरपंचाच्या मनमानीला आळा घालावा, सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर उपसरपंच माया माधव तिगोटे, ग्रा.पं.सदस्य अमोल तिगोटे, गोदावरी पवार, कलावती एकलारे, भगवान शिंदे व पद्मिनबाई हाबगुंडे यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडblock development officerगटविकास अधिकारी