जांब बु : जांब बु व पाखंडीवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत अनेक जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे आरोग्य विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.
जांब बु.हे दहा हजार लोकसंख्येचे गाव व पाखंडेवाडी दोन हजार वस्तीचे गाव असून, या गावांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, नालीचे पाणी रस्त्यावर आले असून, ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्याने डासांचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे नागरिक हे विविध आजारांच्या कचाट्यात सापडलेले आहे .
या गावात मलेरिया तसेच डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. अनेक रुग्णांवर जळकोट येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच जांब बु. व पाखंडेवाडी गावांमध्ये साठवणूक केलेल्याचे पाण्याचे स्त्रोत आहेत. त्यामध्ये अबेटिग करण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
यशच्या हत्येचा निषेध, आज हिमायतनगर बंद
हिमायतगनर : यश मिरासे खून प्रकरण नेमके कोणत्या कारणामुळे घडले, याचा तपास लावण्यात पोलिसांना यश न आल्याने १६ सप्टेंबर रोजी निषेध म्हणून हिमायतनगर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस यंत्रणा कर्तव्यात कसूर करीत असल्याचा आरोप समाजबांधवांनी केला. या घटनेचा उलगडा व्हावा, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी बंदचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डी. एन. गायकवाड, पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
१ लाख ३० हजारांचा गुटखा पोलिसांनी पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध मोहीम उघडली उघडून धानोरा येथील एका घरात सापळा रचून १ लाख ३० हजार ७३४ रुपयांचा गुटखा पकडला.
किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक व पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे, फौजदार एच. पी. घुले, पो. कॉ. बाबू माहुरे, होमगार्ड सय्यद फिरोजअली, सुरेश माने, विश्वंभर मुसळे यांच्या पथकाने सापळा रचून धानोरा येथील वहिद यांच्या घरात साठवून ठेवलेला सागर, राजनिवास पानमसाला व आरके, विमल, मुसाफिर गुटखा पकडून जप्त केला आहे. मात्र वहिद फरार झाला.