शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

समतेसाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:56 IST

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य उभे केले़ जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा शिवरायांच्या विचार आणि कार्यातून मिळते़ आज सामाजिक गरजा ओळखून सर्वांनी एकत्र येवून विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्याची गरज आहे़ त्या कार्यासाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे प्रतिपादनसार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित सोहळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य उभे केले़ जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा शिवरायांच्या विचार आणि कार्यातून मिळते़ आज सामाजिक गरजा ओळखून सर्वांनी एकत्र येवून विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्याची गरज आहे़ त्या कार्यासाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़नवा मोंढा येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या मुख्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ ते म्हणाले, आज शिवरायांचा जन्मोत्सव जगभरात साजरा होतो, ही तमाम बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब आहे़ आजच्या परिस्थितीत निर्माण होणारे प्रश्न निर्माण करणारे कोण आहेत, हे ओळखून ते रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे़ शेतकरी आत्महत्या रोखणे ही सर्व समाजाची सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी पुढाकार महत्त्वाचा असल्याचे खा़चव्हाण म्हणाले़ मराठा आरक्षणासाठी काढलेल्या लाखोंच्या मोर्चानंतरही सरकारदरबारी दखल घेतली जात नाही़ ही खेदाची बाब असून मराठा समाजाला बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे खा़चव्हाण म्हणाले़ येणाºया काळात लाखोंच्या मोर्चाची दखल न घेतल्यास वेगळ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले़ मी या ठिकाणी पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही तर समाजबांधव म्हणून उपस्थित राहिलो़ यापुढेही समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सदैव आपल्यासोबत असेल, असे आश्वासन खा़ चव्हाण यांनी दिले़ दरम्यान, खा़अशोकराव चव्हाण यांनी अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त केला़आ़डी़पी़सावंत, आ़ हेमंत पाटील, डॉ़ मीनल खतगावकर आदींची समयोचित भाषणे झाली़ दरम्यान, ‘शिवचरित्रातून आम्ही काय शिकावे?’ या प्रा़ संतोष देवराये यांच्या डॉक्युमिट्रीच्या सीडीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले़सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेवून आज त्यांचा जन्मोत्सव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करीत असल्याचे सांगितले़ तसेच मराठा समाजातील मुलींसाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहाच्या पूर्णत्वासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा़ ज्यांना शक्य वेळ, पैसा, साहित्य, बौद्धिकता आदींद्वारे मदत करावी, असे आवाहन केले़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराये, रमेश पवार यांनी तर स्वागताध्यक्ष नानाराव कल्याणकर यांनी आभार मानले़