शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र मराठवाडा नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 16:46 IST

स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचे सांगत अशा मागणीमागे कुठलाही आधार नाही़ त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या शक्तीला आमचा कायम विरोध राहील, असे स्पष्ट मत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले़

ठळक मुद्देमराठवाडा जनता विकास परिषदेची वार्षिक बैठकअ‍ॅड़ प्रदीप देशमुख यांची मागणी चुकीची असून मराठवाडा जनता विकास परिषद अशा मागणीला कायम विरोध करील

नांदेड : स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचे सांगत अशा मागणीमागे कुठलाही आधार नाही़ त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या शक्तीला आमचा कायम विरोध राहील, असे स्पष्ट मत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले़शाखेच्या नांदेड शहर वार्षिक बैठकीत स्वतंत्र मराठवाड्याचा मुद्दा उपस्थित झाला़ जनता विकास परिषदेच्याच अ‍ॅड़प्रदीप देशमुख यांनी मध्यंतरी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली होती़ पाच दशकांत मराठवाड्याचा विकास झाला नाही़ वैधानिक विकास मंडळाचा उपायही तकलाघू असल्याचे सांगत मराठवाड्याचे स्वतंत्र अस्तित्व अपरिहार्य असल्याचे मत अ‍ॅड़देशमुख यांनी नोंदविले होते़ अ‍ॅड़देशमुख यांची ही मागणी चुकीची असल्याचे सांगत मराठवाडा जनता विकास परिषद अशा मागणीला कायम विरोध करील, असे स्पष्टीकरण परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी दिले़ माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली़ आम्ही एकसंघ व एकात्म महाराष्ट्राशी बांधील असल्याचे सांगत, स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी जे धर्मनिरपेक्ष आणि समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठीच जनता विकास परिषदेने विविध आंदोलने केल्याचे सांगितले़या बैठकीत परिषदेचे संचालक हर्षद शहा यांनी दिल्ली-मुंबई कॉरीडॉर जालना-नांदेडमार्गे झाला पाहिजे अशी मागणी केली़ उमाकांत जोशी यांनी मराठवाड्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयावर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी झेंडावंदन अनिवार्य करावे, असे मत नोंदविले़ या बैठकीला परिषदेचे माजी केंद्रीय कोषाध्यक्ष द़मा़रेड्डी, शहर शाखेचे सरचिटणीस प्रा़डॉ़विकास सुकाळे, कोषाध्यक्ष प्राचार्य गोपाळराव कदम आदींची उपस्थिती होती़ शेवटी प्रा़अशोक सिद्धेवाड यांनी आभार मानले़रस्त्याच्या गुणवत्तेसाठी बजेटचे वॉर्डवाचन व्हावेमराठवाडा जनता विकास परिषदेच्या नांदेड शहर शाखेच्या बैठकीत विविध मुद्यांवर उपस्थितांनी मते मांडली़ प्रा़उत्तम सूर्यवंशी यांनी नांदेडच्या नियोजनबद्ध विकासासाठी महापालिका आयुक्तांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये, अशी मागणी केली़ बांधकाम गुत्तेदारांकडून रस्त्याच्या गुणवत्तेसाठी बजेटचे वॉर्डवाचन करावे, याबरोबरच दलित वस्तीसाठी मनपाचा राखीव निधी वापरताना आयुक्तांनी निकषांच्या अंमलबजावणीसाठी समिती नियुक्त करावी, अशी मागणीही सूर्यवंशी यांनी यावेळी केली़