शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपात अपात्र ठेकेदार पुन्हा झाला पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:42 IST

महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ येथे गांधीनगरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत पात्र नसलेल्या एका ठेकेदारास पात्र ठरविल्याचा प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देदलितवस्ती कामाची निवीदा प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ येथे गांधीनगरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत पात्र नसलेल्या एका ठेकेदारास पात्र ठरविल्याचा प्रकार पुढे आला आहे.महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत होळी येथील पाणीपुरवठा कामात चोरीचे पाईप वापरल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले होते. मात्र त्यानंतरही एका निविदा प्रक्रियेत ‘सोहेल’ पात्र ठरल्याचा प्रकार पुढे आला होता.यावरुन मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर तरी प्रशासकीय पातळीवर पात्र ठेकेदाराला निविदा प्रक्रियेत सामावून घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. प्रभाग ४ मध्ये गांधीनगर भागात रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठी ५१ लाख रुपयांचे निधी मंजूर होता. या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या पाच ठेकेदारामध्ये सुरज इंटरप्राईजेस नांदेड या ठेकेदारास केवळ ५० लाखापर्यंतची कामे करण्याचा परवाना आहे.असे असतानाही सदर ठेकेदार महापालिकेच्या ५१ लाखांच्या निविदा प्रक्रियेत सहभागी झाला अन् तो पात्रही झाला आहे. पुढे या कामाच्या निविदा प्रक्रियेत सुरज इंटरप्राईजेस आणि मे. कामारीकर कंन्स्ट्रक्शन या दोन्ही ठेकेदाराचे दर समान आले होते.त्यांना पुन्हा बंद लखोट्यात दर सादर करण्यास कळवले. त्यात मे. कामारीकर कन्स्ट्रक्शन हे पूर्वीच्या दरापेक्षा काम करण्यास तयार नव्हते. तर सुरज इंटरप्राईजेसनेही हे काम करण्यास तयार नसल्याचे महापालिकेला कळविले.या निविदा प्रक्रियेत ऐनवेळी निविदा प्रक्रियेत माघार घेतल्याने सुरज इंटरप्राईजेस नांदेड यांची इमडी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर मे. कामारीकर कन्स्ट्रक्शनला हे काम देण्याचे आदेश देण्यात आले होते.एकूणच पात्र नसलेल्या ठेकेदाराला महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरवून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच स्पर्धा निर्माण करण्यासाठी पात्र ठरविले जाण्याचा नवाच पायंडा मनपात सुरु झाला आहे.या प्रकरणात नूतन आयुक्त लहुराज माळी आता काय भूमिका घेतील, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.---संबंधित प्रकरणाची चौकशी करू- आयुक्तप्रभाग क्रं. ४ मधील दलितवस्ती निधीतून रस्ते आणि नाली कामाच्या निवीदा प्रक्रियेतील अनियमीतते संदर्भात महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्याशी संपर्क साधला असता, निवीदा प्रक्रियेत अनियमीतता झाली असल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर निश्चीतपणे संबंधितावर कारवाई करण्यात येईल. असे आयुक्त माळी यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिका