शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बहिष्कार घातलेल्या पारधी कुटुंबियांचे पुनर्वसणासाठी विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 14:09 IST

नांदेड जिल्ह्यातील पिंप्री महिपाल या गावचे पारधी कुटुंब गेल्या २५ आॅक्टोबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे.

ठळक मुद्देमागील नऊ महिन्यांपासून या कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. संरक्षणासाठी पाड्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पण कोणत्याच दुकानातून यांना मिळू शकत नाही.

औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील पिंप्री महिपाल या गावचे पारधी कुटुंब  गेल्या २५ आॅक्टोबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे. या कुटुंबाच्या मागण्यांकडे प्रशासनाने अद्याप तरी लक्ष दिलेले नाही. त्यांच्या मदतीसाठी गुरुवारी कॉ. मनोहर टाकसाळ, मेजर सुखदेव बन व कॉ. बुद्धप्रिय कबीर या औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली व विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या कानावर उपोषणकर्त्यांचे म्हणणे घालावे, असा प्रयत्न केला. पण  महसूल प्रबोधिनी येथील कार्यशाळेत विभागीय आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकारी  उपस्थित असल्याने कुणाचीच भेट होऊ शकली नाही. 

पिंप्री महिपाल येथे आम्ही पिढ्यान्पिढ्या राहत आलो आहोत. गायरान जमीन कसून उपजीविका करीत आहोत. गायरान जमिनीतून उठवून लावण्यासाठी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी गावगुंडांनी आमच्या पाड्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात जीव वाचविण्यासाठी आम्ही सैरावैरा पळत सुटलो. तरीही त्यांनी आम्हाला गाठून मारहाण केली. आम्हाला गंभीर दुखापती झाल्या. हल्लेखोरांच्या या मारहाणीत शिवम जिगनू पवार हा दहा वर्षांचा मुलगा बेपत्ता आहे.  तो अद्याप सापडला नाही, अशी माहिती शीला शिंदे यांनी दिली. 

शीला शिंदे यांनी आणखी सांगितले की, जातीय द्वेषातून आमच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. संरक्षणासाठी पाड्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पण आम्हाला कोणत्याच दुकानातून माल मिळू शकत नाही. गावगुंड पोलिसांसमक्ष पाड्यावर येऊन शिवीगाळ करतात व मारहाण करतात. नांदेड पोलीस अधीक्षकांनी पारधी समाजास माणुसकीची वागणूक देण्याचा सल्ला देऊनही काहीच उपयोग झाला नाही. अशा तणावग्रस्त वातावरणात आम्ही राहायचे कसे, खायचे कसे, जगायचे कसे असा सवाल उपोषणार्थी कुटुंबाने उपस्थित केला. पीडित कुटुंबांचे सरसकट पुनर्वसन करण्यात यावे, बहिष्कार टाकणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्या केल्या.

गाव गुंडांनी घरकुले उद्ध्वस्त केली उपोषणार्थी शीला शिंदे, सुरेश पवार, दशरथ पवार व मौनाबाई पवार यांनी सांगितले की, मागील नऊ महिन्यांपासून आमच्यावर  सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. आम्हाला मिळालेली घरकुले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. आम्ही कसत असलेल्या शेतीवर गावगुंडांचा डोळा आहे. आम्हाला सळो की पळो करून सोडण्यात आल्याने आम्ही गावात जाऊ शकत नाही. न्याय मिळावा म्हणून आमची काही मंडळी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहोत तर आम्ही विभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहोत. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. महसूल प्रबोधिनी येथील कार्यशाळेत विभागीय आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकारी  उपस्थित असल्याने कुणाचीच भेट होऊ शकली नाही.