शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लोह्यात अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST

शेतकऱ्याचे नुकसान उमरी : तालुक्यातील सावरगाव दक्षिण येथे जनावराच्या गोठ्याला शाॅर्टसर्किटमुळे आग लागून कडबा व शेती अवजारे जळून खाक ...

शेतकऱ्याचे नुकसान

उमरी : तालुक्यातील सावरगाव दक्षिण येथे जनावराच्या गोठ्याला शाॅर्टसर्किटमुळे आग लागून कडबा व शेती अवजारे जळून खाक झाली. शेतकरी उत्तम जगदेकर, आनंद जगदेकर, भीमराव जगदेकर, बालाजी दुधमल यांच्या गोठ्याला आग लागून उपरोक्त प्रमाणे नुकसान झाले. यात शेतीला पाणी देण्यासाठी ठेवलेले पाइपही जळाले. कार्ला सज्जाचे तलाठी सोनार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

अवैध दारू विक्री करणारे पकडले

धर्माबाद : तालुक्यातील सायखेड येथे एका किराणा दुकान तसेच हॉटेलमधून देशी व विदेशी दारूची विक्री सुरू होती. याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या सहकाऱ्याने तेथे जाऊन छापा मारला. यावेळी ६ हजार ९३० रुपयांची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी श्रीनिवास यम्मेवार, नागोराव वडपत्रे यांना अटक करण्यात आली.

कोरोना प्रतिबंधक लस

हिमायतनगर : तालुक्यातील बेल्लोरी-धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ जि.प. सदस्या कमलताई हुरदुके, सरपंच शामराव हुरदुके यांच्या हस्ते झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.डोळस, परिचारिका ठाकरे, हातोडे, श्रीमंगले, सुपरवायझर तांबारे, चव्हाण, राठोड, वाघमारे, खुडे आदी उपस्थित होते.

रस्त्याच्या कामाला सुरुवात

हदगाव : तालुक्यातील पळसा येथून एक कि.मी. अंतरावरील किन्हाळा येथे कठीण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. गावात रस्ताच नसल्यामुळे काही जणांनी आ. माधवराव जवळगावकर यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती. जवळगावकर यांनी स्थानिक विकास निधीतून १२ लाख रुपयांची मंजुरी दिली. सुभाष राठोड यांनी कामाला सुरुवात केली. यावेळी सरपंच प्रतिभा वाढवे, माजी सरपंच रमेश राठोड, कुबेर राठोड, समीर पटेल, अनुसयाबाई जाधव, विजय राठोड, चंद्रकला राठोड आदी उपस्थित होते.

कुंटूरकर यांना श्रद्धांजली

बिलाेली : बिलोली येथे कै. गंगाधरराव कुंटूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, राष्ट्रवादीचे नागनाथराव पाटील, गंगाधर प्रचंड, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, विजय मुंडकर, लक्ष्मणराव पाटील, गौसोद्दीन कुरेशी, सदाशिव बोडके, ॲड. बाबूराव देशमुख, इंद्रजित तुडमे, राजू पाटील, विठ्ठल चंदनकर, लक्ष्मण शेटीवार, दादाराव इंगळे, बाबूराव इंगळे, शेख रियाज, रणजित हिवराळे आदी उपस्थित होते.

१० हजारांची दारू जप्त

देगलूर : तालुक्यातील हणेगाव येथे पेट्रोलपंपासमोर छापा टाकून पोलिसांनी ९ हजार ९८४ रुपयांची अवैध दारू व दुचाकी जप्त केल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री घडली. यावेळी एम.एच. २६ बी.एस. ७१५७ या क्रमांकाची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. जमादार मोहन कनकवळे यांनी ही कारवाई केली. मरखेल पोलिसांत या घटनेची नोंद झाली.

हळदा येथे लसीकरण

भोकर : तालुक्यातील मोघाळी प्रा.आ. केंद्रांतर्गत हळदा येथील उपकेंद्रात माजी सरपंच बालाजी नारलेवाड यांच्या हस्ते लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच बाबूराव नागमोड, सदस्य चंद्रकांत नागमोड, विलास किसवे, शंकरराव पेरेवार, सुरेश इडेवार आदी उपस्थित होते. यावेळी ४५ वर्षांवरील नागरिक व महिलांना लस देण्यात आली.

घराला लागली आग

किनवट : शहरातील रामनगर परिसरातील एका घराला आग लागली. यात रोख ४५ हजार रुपये जळून खाक झाले. सोमवारी सकाळी ही घटना घडली. वाऱ्यामुळे आगीची ठिणगी याेगेश पाध्ये यांच्या टीनशेडच्या घरावर उडाली. पत्रावर असलेल्या लाकडाने पेट घेऊन आग पसरली. घरात एक महिला व दोन पुरुष होते. आगीचे लोट दिसताच तिघेही घराबाहेर पडले. पाहता पाहता आगीत कपडे, भांडी, साहित्यासह रोख ४५ हजार रुपये जळून खाक झाले.