शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही नद्यांचे पाणी वळविले नाही तर मराठवाड्यातील धरणे कोरडी पडतील - अशाेकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

बुधवारी शहरातील कुसुम सभागृहात डॉ. शंकरराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित परिसंवाद व मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे ...

बुधवारी शहरातील कुसुम सभागृहात डॉ. शंकरराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित परिसंवाद व मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण तर अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, संपादक राजीव खांडेकर, सत्कारमूर्ती माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. किशनराव राठोड, माजी आ. केशवराव औताडे, ‘टोकाई’चे माजी अध्यक्ष शंकरराव खराटे, पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे, उद्योजक अनंत घारड, काँग्रेस प्रवक्ता तथा संपादक संतोष पांडागळे, संचालक संदीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जलसंपदामंत्री म्हणून काम करत असताना शंकरराव चव्हाण यांनी राज्यात विविध धरणांची उभारणी केली. त्यामुळे मराठवाड्यातील सिंचन क्षेत्र वाढू शकले. आज त्यांच्याच दूरदृष्टीने मराठवाड्यासह अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी १८ मोठी धरणे उभारली तर १६ धरणांची तरतूद केली. १२ हजार मेगावॅट विजेची निर्मिती झाली. जायकवाडी धरणाच्या विरोधात तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी २२ आक्षेप नोंदविले होते. त्या वेळी पाटबंधारेमंत्री असलेल्या शंकरराव चव्हाण यांनी जल आयोगासमोर समर्पक उत्तरे देऊन आक्षेप खोडून काढले. त्यामुळेच आज जायकवाडी उभे राहिले. काश्‍मीर, पंजाब, तामिळनाडू व ईशान्य भागात फुटीरतावादामुळे अशांतता पसरली होती. त्या वेळी धाडसी निर्णय घेत त्यांनी या भागात शांतता प्रस्थापित करण्याचे काम त्यांनी केले.

ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी शंकरराव चव्हाण यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच सत्कारमूर्ती माजी मंत्री भास्करराव पाटील यांनी शंकरराव चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विश्‍वाधार देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोहर आयलाने यांनी मानले.