कंधार : तालुक्यात शिधापत्रिकात समाविष्ट सदस्यांची रेशन दुकानदाराकडून आधार व्हेरिफिकेशन (सत्यापन) चालू आहे. आपण आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर आपणास काही फटका बसणार का? असा दुष्काळात कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांत संभ्रम असल्याचे चित्र आहे. परंतु त्यांना राज्यात कोठेही यंत्रात आधार व्हेरिफिकेशन करता येते, असे तहसीलमधील संबंधित विभागातून सांगण्यात आले.तालुक्यात ५ प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या ४५ हजार ३ अशी आहे. त्याची लोकसंख्या २ लाख २१ हजार ७७९ अशी आहे. त्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक संख्या ३ हजार ३० व लोकसंख्या १५ हजार ३७७ आहे. प्राधान्य कुटुंब योजनेचे ३२ हजार १२१ शिधापत्रिका धारक व लोकसंख्या १ लाख ६० हजार ६८६ आहे. ही सगळ्यात जास्त शिधापत्रिका व लोकसंख्या असलेली संख्या आहे.एपीएल शेतकरी शिधापत्रिका ७ हजार ८८२ आहे. याची लोकसंख्या ३७ हजार ५४३ आहे. एनपीएच केशरी ६९१ व लोकसंख्या २ हजार ४९३ आणि एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारक संख्या १ हजार २७९ असून लोकसंख्या ५ हजार ६८० आहे. एनपीएचव एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नाही. इतर शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळते.आधार काढताना नावात चुका, जन्मतारखेत चूक असेल तर दुरूस्ती करणे गरजेचे आहे. आॅनलाईनचे काम सुमारे ८० टक्के झाल्याचे समजते. मेंबर आधार व्हेरिफिकेशनचे काम १७६ दुकानात चालू आहे. रेशन दुकानात ई-पॉश मशीन आहेत. तेथे अंगठा लावणे गरजेचे आहे. येथे अंगठा मॅच होत नसेल तर आधार केंद्रात जावे लागेल. आधार व्हेरिफिकेशन केल्याने नावात दुरूस्ती होईल. शिधापत्रिका मिळतील, लाभार्थ्यांना जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास अडचण होणार नाही.१५ वर्षांखालील मुलांचे व वयोवृद्ध व्यक्तीचे आधार व्हेरिफिकेशन करताना अडचण येत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यासाठी जवळच्या आधार केंद्रात आधार अपडेट करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. सध्या रेशन बंद होणार नाही ; पण भविष्यात मात्र धोका नाकारता येत नाही. तसेच १६ हजार २० जणांचे आधार नोंदविणे शिल्लक आहे. त्यांना आता ईकेवायसीच्या माध्यमातून नोंदणी करता येते. आता या संधीचा फायदा संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार संतोषी देवकुळे यांनी केले आहे.तालुक्यात दुष्काळ असल्याने अनेक कुटुंबातील सदस्य पाल्याच्या शिक्षण, विवाह, रोजीरोटीसाठी वीटकाम, बांधकाम, ऊसतोडणीसाठी तात्पुरते स्थलांतरित झाले आहेत. गावाकडून आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी अशा सदस्यांना भ्रमणध्वनी केले जात आहेत. लांब असलेल्या सदस्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. राज्यात कोठेही आधार व्हेरिफिकेशन करता येते.
शिधापत्रिकाधारक सदस्यांची आधार व्हेरिफिकेशनसाठी धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:42 IST
तालुक्यात शिधापत्रिकात समाविष्ट सदस्यांची रेशन दुकानदाराकडून आधार व्हेरिफिकेशन (सत्यापन) चालू आहे. आपण आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर आपणास काही फटका बसणार का? असा दुष्काळात कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांत संभ्रम असल्याचे चित्र आहे.
शिधापत्रिकाधारक सदस्यांची आधार व्हेरिफिकेशनसाठी धांदल
ठळक मुद्देस्थलांतरित कुटुंबात संभ्रम, योजनांचा लाभ न मिळण्याची भीती