शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा कचेरीसमोर बजेटची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:27 IST

अर्थसंकल्पात मोदी सरकारने योजना कर्मचा-यांना एक पैसाही न देता उलट आरोग्य व शिक्षणावर कर लादल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक बजेटची होळी करण्यात आली़ यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली़

ठळक मुद्देमार्क्सवादी कम्युनिस्टचे आंदोलन : सरकारविरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अर्थसंकल्पात मोदी सरकारने योजना कर्मचा-यांना एक पैसाही न देता उलट आरोग्य व शिक्षणावर कर लादल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक बजेटची होळी करण्यात आली़ यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली़आरोग्याच्या क्षेत्रात काम करणा-या आशा वर्करच्या मानधनात या अर्थसंकल्पात एक रुपयांचीही वाढ करण्यात आली नाही़ या उलट सरकारने स्वत:च्या वेतनात मात्र घसघशीत वाढ केली आहे़ हे सरकार निजामाचे वारसदार असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉ.विजय गाभणे यांनी केली़शालेय पोषण आहार, असंघटित कामगार, शेतकरी, गरीब, मध्यमवर्ग, महिला, कर्मचारी, बेरोजगार, विद्यार्थी, युवक, छोटे व्यापारी या सर्वांसाठी बजेट अत्यंत निराशाजनक आहे़ सरकार या बजेटद्वारे शेतक-यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवू पाहत आहे़ शेतकरी आणि गरिबांबाबत खोटी आकडेवारी सरकारकडून सांगण्यात येत आहे़ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दलित आदिवासींना मिळणा-या हक्काच्या निधीवरही डल्ला मारला असून एससी, एसटीमधील ७५ हजार कोटी रुपये मोदी सरकारने पळविले आहेत़ आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्राचे व्यापारीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक बजेटची होळी करुन आपला निषेध नोंदविला़ आंदोलनाला कॉ़ गंगाधर गायकवाड, कॉ़उज्ज्वला पेडलेवार, कॉ़धोंडगीर गिरी, कॉ़ माधव मोतेवार, ललिताबाई गजभारे, बालाजी कलेटवाड, नागोराव कमलाकर, संतोष साठे, बालाजी गवळकर, कांताबाई दोडके, शारदा ससाणे, वंदना गोडबोले, जयश्री मोरे, रमेश खरंबे यांची उपस्थिती होती़