शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग पोलिसांनी वाचविले दोन वर्षांच्या चिमुकलीचे प्राण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST

रुग्णवाहिकेने २१ कि.मी.चे अंतर केले सोळा मिनिटांत पार अर्धापूर :- इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत असणारी चिमुकली अचानक वरून खाली ...

रुग्णवाहिकेने २१ कि.मी.चे अंतर केले सोळा मिनिटांत पार

अर्धापूर :- इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत असणारी चिमुकली अचानक वरून खाली पडली असता गंभीर जखमी झाली. तिला कमी वेळात वेळेवर उपचारासाठी रुग्णालयांमध्ये नेल्याने चिमुकल्या मुलीचे प्राण वाचले. याकामी महामार्ग पोलिसांनी मोठा पुढाकार घेतला.

अर्धापूर शहरातील फुलेनगर येथील दयालसिंघ ठाकूर यांच्या येथे किरायाने राहत असलेल्या शिक्षिका रेणुका सुदाम नाईक यांची मुलगी अनुष्का शिवाजी सुरकुटे (वय २ वर्षे) छतावर खेळत असताना अचानक तोल गेला व खाली पडली. डोक्याला जबर मार लागल्याने ती दोन वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली व बेशुद्ध झाली. वडील बाहेरगावी गेले होते व आई रेणुका नाईक या जि.प. हायस्कूल अर्धापूर येथील शाळेत शिकविण्यासाठी नोकरीवर गेल्या होत्या. घरी कोणीही नव्हते अशावेळी घर मालक दयालसिंघ ठाकूर यांनी त्या चिमुकलीला महामार्ग पोलीस केंद्र (वसमत फाटा) अर्धापूर, नांदेड येथे आणले. क्षणाचाही विलंब न करता महामार्ग पोलीस गजानन कदम, रमाकांत शिंदे यांनी रुग्णवाहिकेत त्या चिमुकलीला नांदेड येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी त्या मुलीवर उपचार केले. कमी वेळेत उपचारासाठी आणल्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले. महामार्गचे एपीआय शेख रहेमान, ज्ञानेश्वर बसवंते यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन कदम, रमाकांत शिंदे, ज्ञानेश्वर तिडके, राजकुमार व्यवहारे, कमलेश जमदाडे व गणेश लोसरवार यांनी परिश्रम घेतले.

२१ कि.मी.चे अंतर सोळा मिनिटांत पार

अर्धापूर महामार्ग केंद्र पोलीस प्रशासनाने नांदेड कंट्रोल रूमला वायरलेसद्वारे संपर्क केला. यावेळी नांदेड येथील पथकाने राज कॉर्नर ते वजिराबाद रस्ता मोकळा ठेवला. रस्ता मोकळा असल्याने अर्धापूर ते यशोसीई हॉस्पिटल २१ कि.मी.चे अंतर रुग्णवाहिकेने १६ मिनिटांत पार केले. अर्धापूर येथून घेऊन निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला.