शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या खून प्रकरणात पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:17 IST

जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची सून डॉ़चेतना विकास केंद्रे यांचा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता़ याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता़ ३१ मे रोजी ही घटना घडल्यानंतर दोन महिन्यांपासून केंद्रे कुटुंबिय फरार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची सून डॉ़चेतना विकास केंद्रे यांचा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता़ याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता़ ३१ मे रोजी ही घटना घडल्यानंतर दोन महिन्यांपासून केंद्रे कुटुंबिय फरार आहे़ त्यात मयत चेतना यांचे पती डॉ़विकास केंद्रे याला सोमवारी पोलिसांनी पकडले आहे़चेतना या नागपूरला शिक्षण घेत असताना त्यांचे विकास केंद्रे याच्याशी पे्रम जडले होते़ परंतु विकासच्या लग्नाला केंद्रे कुटुंबियांचा अगोदरपासूनच विरोध होता़ त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांच्या कुटुंबात वाद होत होता़ त्या कारणावरुन दोन्ही कुटुंबात याच विषयावरुन मारहाणीचाही प्रकार घडला होता़ त्यात ३० मे च्या रात्री चेतना या केंद्रे यांच्या घरासमोर बेशुद्धावस्थेत आढळल्या़ त्यांना शिवाजी पाटील या व्यक्तीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केल होते़ रुग्णालयात चेतना यांचा मृत्यू झाला़याप्रकरणी मयत चेतना यांच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती़ त्यानुसार विकास केंद्रे, पद्माकर केंद्रे, राहूल केंद्रे, शिवाजी पाटील, खाजगी रुग्णालयातील डॉक्टरसह अन्य दोघे अशा सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता़ परंतु घटनेनंतर केंद्रे कुटुंबिय फरार झाले होते़ गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस आरोपींचा शोध घेत होते़ सोमवारी डॉ़विकास केंद्रे हा लोहा येथे असल्याची माहिती पोनि़ नरवाडे यांना मिळाली होती़ त्यानंतर नरवाडे यांनी पथकासह लोहा गाठून विकास केंद्रे याला अटक केली़ या प्रकरणात इतर आरोपींचाही शोध घेण्यात येत आहे़