शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मेगा अ‍ॅग्रोच्या प्रकरणात आता १३ आॅगस्टला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:29 IST

कृष्णूरच्या इंडिया मेगा अ‍ॅग्रो कंपनीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या ठिकाणचे १५ युनिट बंद करण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी उच्च न्यायालयात कारवाईदरम्यान फक्त फ्लोअर मिल सील करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे़ त्यामुळे कंपनीचे १४ युनिट आता सुरु होणार आहेत़ कंपनी बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेच आदेश दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले असून या प्रकरणात आता १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे़

ठळक मुद्दे१४ युनिट होणार सुरु : एकच युनिट बंद केल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूरच्या इंडिया मेगा अ‍ॅग्रो कंपनीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या ठिकाणचे १५ युनिट बंद करण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी उच्च न्यायालयात कारवाईदरम्यान फक्त फ्लोअर मिल सील करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे़ त्यामुळे कंपनीचे १४ युनिट आता सुरु होणार आहेत़ कंपनी बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेच आदेश दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले असून या प्रकरणात आता १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे़१७ जुलै रोजी पोलिसांनी कृष्णूरच्या इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीवर धाड मारली होती़ या ठिकाणाहून पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्याचे आठ ट्रक पकडले होते़ या प्रकरणात कंपनीच्या संचालकासह इतरांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ यावेळी पोलिसांनी कंपनीचे सर्वच्या सर्व पंधरा युनिट बंद केल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आला होता़ त्यानंतर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली़न्यायालयात सुनावणी दरम्यान नांदेड पोलिसांनी सर्वच्या सर्व युनिट बंद केले नसून फक्त फ्लोअर मिल बंद केले आहे, असे स्पष्ट केले़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १० आॅगस्टच्या पत्रानुसार कंपनी बंद करण्याबाबत कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे़ याबाबत आता १३ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़दरम्यान, पोलीस कारवाईच्या धास्तीने मेगा अ‍ॅग्रो अनाज लिमिटेड कृष्णूर येथील कामगारांनी परराज्यात पलायन केले आहे़ कारखान्याचे व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया यांचा जामीन फेटाळला आहे़ तापडियावर गुन्हा दाखल झाला आहे़ त्यात युनिट बंद असून चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी या ठिकाणच्या अनेक परप्रांतीय कामगारांनी पलायन केले आहे़ त्यात आता कंपनीचे १४ युनिट सुरु होणार असल्याची माहिती आहे़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयfraudधोकेबाजी