शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमुलींसाठी स्वतंत्र अपंग शाळा

By admin | Updated: January 28, 2015 14:06 IST

मुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अनुराग पोवळे /नांदेडमुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात तसेच मुली असलेल्या निवासी शाळेत कंत्राटी तत्वावर तरी महिला अधीक्षक नेमाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे उपायुक्त माधव वैद्य यांनी दिली.नायगाव तालुक्यातील नरसी येथील जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव पीर ता. मुखेड संचलित निवासी मूकबधीर शाळेत घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर २७ जानेवारी रोजी उपायुक्त माधव वैद्य यांनी त्या शाळेस भेट दिली. तसेच त्यांनी पीडित मुलीची बिलोली येथे जावून भेट घेतली. यावेळी वैद्य यांनी शाळेतील परिस्थितीची माहिती घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांचीही उपस्थिती होती. शाळेतीलच तीन शिपाई असलेल्या कर्मचार्‍यांविरूद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचीही त्यांनी भेट घेवून घटनेची माहिती घेतली. या भेटीनंतर लोकमतशी बोलताना वैद्य यांनी सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याने या निवासी मूकबधीर शाळेची मान्यता काढून घेण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याचे सांगितले. तसेच पीडित मुलगी मागासवर्गीय असल्याने अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मुलीला समाजकल्याण विभागाकडून तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत देण्याचाही प्रस्ताव असल्याचे सांगितले. दुसरीकडे निवासी अपंग शाळेतील मुलींच्या शोषणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. या गंभीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी आता निवासी स्वरूपात असलेल्या या शाळा मुले आणि मुलींसाठी स्वतंत्ररित्या चालवाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. लातूर विभागांतर्गत आजघडीला जवळपास ३५0 निवासी शाळा आहेत. त्यात ६२ शाळा नांदेड जिल्ह्यात आहेत. या निवासी अपंग शाळांमध्ये मूकबधीर, मतीमंद, अपंग, अंध शाळांचा समावेश आहे. ज्या शाळांमध्ये मुलीं आहेत त्या शाळांवर निवासी महिला अधीक्षक नेमणुकीचा प्रश्नही महत्वाचा आहे. त्यामुळे अशा शाळांवर कंत्राटी स्वरूपात तरी महिला अधीक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैद्य म्हणाले.दरम्यान, या प्रकरणात समाजकल्याण विभागाने विनयभंगाचे गुन्हे दाखल झालेल्या शाळेतील शिपाई चंद्रकांत बरमे, मुजीब शहाजीर आणि देवीदास तिपले यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे समाजकल्याण अधिकारी खमीतकर यांनी सांगितले.

 ■ नरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयाची मान्यता काढण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने शासनाकडे पाठविला आहे. या शाळेत एकूण ४0 विद्यार्थ्यांची मान्यता आहे. प्रत्यक्षात शाळेत आजघडीला एकूण ५४ विद्यार्थी आहेत. त्यात २५ मुली आहेत. मान्यता काढल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी इतर शाळेत हलविण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैद्य यांनी सांगितले. त्यामुळे शासनाकडून या शाळेवर कारवाई होईल हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील कलम वाढवावेत अशी मागणी होत आहेत.