शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा कचेरीसमोर दिव्यांगांचे बेमूदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:18 IST

दिव्यांगाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग मित्रमंडळ संघर्ष सेनेच्यावतीने बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनात जिल्हाभरातील दिव्यांग सहभागी झाले आहेत़ त्यात वृध्दांचाही समावेश आहे़

ठळक मुद्देआतापर्यंतच्या १७ आंदोलनांची दखल नाही, मार्ग निघेपर्यंत आंदोलन सुरु राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: दिव्यांगाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग मित्रमंडळ संघर्ष सेनेच्यावतीने बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनात जिल्हाभरातील दिव्यांग सहभागी झाले आहेत़ त्यात वृध्दांचाही समावेश आहे़दिव्यांगांच्या प्रश्नावर जिल्ह्यात अपंग मित्र मंडळ संघर्ष सेनेच्यावतीने आतापर्यंत जिल्हाधिकाºयांसह विविध विभागप्रमुखांशी चर्चा करण्यात आली़ मात्र दिव्यांगांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला नाही़उपोषण, मोर्चा, भीक मागो आंदोलन, मुंडन आंदोलन असे विविध १७ प्रकारचे आंदोलन करण्यात आले़ मात्र याची दख न घेतल्याने दिव्यांगांनी १८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलनाला प्रारंभ केला आहे़धरणे आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली़ मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन बेमूदत सुरू ठेवण्याचा निर्धार दिव्यांगांनी केला आहे़ जवळपास ३०० दिव्यांग या आंदोलनात सहभागी झाले आहेत़दिव्यांगांना दिले जाणारे प्रमाणपत्र हे अपात्र व्यक्तींना देण्यात येऊ नयेत, दिव्यांगांचे या ना त्या कारणांमुळे नाकारलेले प्रमाणपत्र त्वरीत देण्यात यावेत, दिव्यांगाना शासनाच्या योजनांचा लाभ नियमितपणे द्यावा, दिव्यांगांचा तीन टक्के निधी वेळेवर खर्च करावा, दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत़ आंदोलनात चंपतराव डाकोरे, विठ्ठल कतरे, पठाण इम्रानखान,अशोक मुळेकर, संतोष चाभरेकर, शंकर मुपडे, कलावती पोहरे, अशोक कानगुले, शेषराव रंडाळे, व्यंकटराव जाधव, बापुराव लामदाडे, भानुदास शिंदे, रामजी लांडगे आदींचा समावेश आहे़