शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळू विक्रीला लागणार जीएसटी; बिलोलीत ठेकेदारांकडून घेतले लेखी हमीपत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:42 IST

विक्रीकर आकारणी करण्यास उशीर झाल्याने जिल्ह्यातील वाळू उपशास विलंब झाला आहे. दरम्यान, वाळू विक्रीवरही जीएसटी लागणार असल्याची माहिती मिळाली; पण राज्यजीएसटी विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने ई-लिलावातील संबंधित ठेकेदारांकडून जीएसटीचे हमीपत्र भरुन घेतले जात आहे.

बिलोली ( नांदेड ): विक्रीकर आकारणी करण्यास उशीर झाल्याने जिल्ह्यातील वाळू उपशास विलंब झाला आहे. दरम्यान, वाळू विक्रीवरही जीएसटी लागणार असल्याची माहिती मिळाली; पण राज्यजीएसटी विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने ई-लिलावातील संबंधित ठेकेदारांकडून जीएसटीचे हमीपत्र भरुन घेतले जात आहे.

नोव्हेंबर २०१७ पासून मांजरा, गोदावरी या नदीपात्रातील शासकीय वाळूघाटांची ई-लिलाव प्रक्रिया प्रारंभ झाली. संपूर्ण मराठवाड्यात  सर्वाधिक  वाळूचा महसूल सीमावर्ती  मांजरा नदीपात्रातून शासनाला मिळतो.  बिलोली व देगलूर तालुक्यात जवळपास ३० शासकीय व ३० खाजगी वाळूपट्टे मोडतात. डिसेंबरअखेर ई- लिलाव  पद्धतीन्वये बिलोली तालुक्यातील १७ पैकी ७ वाळू घाटांना ठेकेदार मिळाले. नागपूर खंडपीठाने  पर्यावरणसंबंधी आक्षेप नोंदवल्यानंतर  काहीवेळ प्रक्रिया थांबली होती. २०१७-१८  अंतर्गत बिलोलीतून पाच कोटींचा महसूल  मिळाला आहे. वाळू उपशासाठी वेगवेगळे ८१ नियम  व अटी शर्ती लावण्यात आले आहे. संबंधित ठेकेदारांनी करार करुन इसारा रक्कम जमा  केली; पण नांदेड प्रशासनाच्या  नजरचुकीने दोन टक्के कर आकारण्याचा विसर पडला. परिणामी पुन्हा संबंधित ठेकेदारांकडून ही रक्कम जमा करुन घेण्यात आली. त्यामुळे वाळू उपशाला परवानगी देण्यास १५ ते २० दिवस  उशीर झाला. दिवसेंदिवस खाजगी व सार्वजनिक बांधकामासाठी  वाळूची प्रचंड  मागणी आहे; पण लिलाव  व ताबा प्रक्रियेस  उशीर  झाल्याने चोरटी वाळू वाहतूक वाढली आहे.वाळू व्यवसायिकांना वाळूवर जीएसटी जवळपास लागणारच आहे, परंतु विक्रीकर विभागाने (सेल टॅक्स)  जिल्हा प्रशासनाला  स्पष्ट  सूचना व माहिती दिली नसल्याने सध्यातरी  संबंधित  ठेकेदारांकडून जीएसटीचे हमीमत्रप भरुन घेणे सुरु झाले. पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष वाळू उपशाला प्रारंभ होईल, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :GSTजीएसटीNandedनांदेड