प्रशासनाने नागरिकांना भयमुक्त करावे - पाटोदेकर
नांदेड, देशातील टॉप दहा शहरांमध्ये नांदेडचा समावेश आहे. त्यामुळे नांदेडच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना भयमुक्त करून त्यांच्यात प्रशासनाने विश्वास निर्माण करावा, असे आवाहन डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा जनता दलाच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. किरण चिद्रावार, महेश शुक्ला, बालाजी आलेवार, अर्चना पारळकर, अश्विनी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पाटोदेकर म्हणाले, नांदेड शहरात ऑक्सिजनचे बेड आणि ऑक्सिजन कमी पडणार नाही, रेमडेसिविरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून जनतेला जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्र सरकारने दुजाभाव न करता महाराष्ट्रात राज्य शासनास मदत करावी, असे आवाहन जनता दलाचे सचिव प्रा. लक्ष्मण शिंदे यांनी केले. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना मोकळीक देऊन व्यापार करू द्यावे, असे मत महासचिव सूर्यकांत वाणी यांनी व्यक्त केले.