शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
4
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
5
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
6
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
7
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
8
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
9
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
10
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
11
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
12
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
13
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
14
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
15
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
16
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
17
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
18
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
19
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
20
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!

ग्रामपंचायत निवडणूक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST

भोकर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्यपदासाठी इच्छुक ७६ जणांनी सोमवारी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्यानंतर आतापर्यंत एकूण ७८ अर्ज ...

भोकर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्यपदासाठी इच्छुक ७६ जणांनी सोमवारी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्यानंतर आतापर्यंत एकूण ७८ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी दिली.

सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी इच्छुकांनी तहसील परिसरात गर्दी केली होती. तालुक्यातील रिठ्ठा, बेंद्री, धावरी खु., रायखोड, पाळज, देवठाणा, नागापूर, पोमनाळा, समंदरवाडी, रेणापूर, किनी, भुरभुसी, आमठाणा, जामदरी, कामनगाव, हाडोळी आदी १६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी ७६ जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत, तर देवठाणा आणि धावरी खु. ग्रामपंचायतीसाठी यापूर्वी दोघांनी अर्ज दाखल केले होते. यामुळे आतापर्यंत एकूण ७८ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना अनेकांनी घोळक्याने येऊन शक्तिप्रदर्शन केले होते.

नामनिर्देशन पत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात २२ टेबल लावण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज भरणे गरजेचे असून, त्यासाठी विविध कागदपत्रांसह जात वैधता प्रमाणपत्र, खर्चासाठी नवीन बँक बचत खाते यासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांची धावपळ होत असल्याने शहरात गर्दी वाढली आहे.

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या १९३ वार्डांतून ५१३ ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार असून, आतापर्यंत फक्त ७८ जणांचेच नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत मोठी गर्दी उसळणार आहे.