शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

सहा पालिकांच्या घनकचरा प्रकल्पास शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:29 IST

नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता केंद्र शासनाच्या पुढाकाराने देशातील शहरी व नागरी भागात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालिकेच्या वतीने उभारावयाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान : नगरविकास विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता केंद्र शासनाच्या पुढाकाराने देशातील शहरी व नागरी भागात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालिकेच्या वतीने उभारावयाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा समावेश आहे.‘स्वच्छ महाराष्टÑ’ अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील ३७ शहरांचे नागरी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे अहवाल महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने तांत्रीक मान्यता देवून ‘निरी’ या संस्थेने सदर प्रकल्पाचे मूल्यांकन केले आहे. त्यानंतर हे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील ३७ शहरांच्या १८३.४६०१ कोटी रूपये किंमतीच्या नागरी,घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, हदगाव, कंधार, किनवट, लोहा आणि उमरी या सहा नगर परिषदांचा समावेश आहे.या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी दोन टप्प्यात या पालिकांना वितरीत करण्यात येणार असून सदर प्रकल्पासाठी वितरीत केलेला निधी त्याच प्रकल्पासाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निधीचा वापर इतर कामासाठी केल्यास ही गंभीर अनियमीतता समजण्यात येईल, असा इशाराही या प्रकल्पांना मान्यता देताना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिला आहे. याबरोबरच पालिकांनी एप्रिल २०१८ पर्यंत शहरात दररोज निर्माण होणाºया घनकचºयापैकी किमान ९० टक्के घनकचरा निर्मीतीच्या जागीच विलगीकरण करून संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.ओल्याची खतनिर्मीती, सुक्या कचºयाचा पुर्नवापरजिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देताना या घनकचºयाचे निर्मीतीच्या जागी १०० टक्के विलगीकरण करण्यास सांगितले आहे. या विलगीकरण केलेल्या कचºयाची वाहतूकही विलगीकृत पद्धतीने करावयाची असून ओल्या कचºयापासून कंपोस्टखत निर्मीती करावी. या खताची प्रयोग शाळेतून तपासणी करून घेवून त्यास हरित महासिटी कंपोस्ट हा ब्रॅण्ड मिळवावा. तर सुक्या कचºयाचे पदार्थ पुर्नप्राप्ती सुविधा केंद्रांवर विलगीकरण करावे यातील पुर्नवापर होणाºया सुक्या कचºयाचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत.या सहा पालिकांना मिळणार निधी‘स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत’ मुदखेड नगर परिषदेच्या नागरी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. मुदखेड पालिकेच्या या प्रकल्पाची मंजुरी किंमत १७०.०५६४ लक्ष एवढी आहे. हदगाव पालिकेच्या प्रकल्पाची मंजुरी किंमत २१९.२७०९ लक्ष एवढी, कंधार- २०७.६१८६ लक्ष, किनवट - २२२.३९०३ लक्ष, लोहा- १८९.९९७७ लक्ष तर उमरी नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची मंजुरी किंमत १३२.४७९५ लक्ष एवढी आहे. या प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीसाठी आवश्यक यंत्रणा संबंधीत पालिकांनी उभा करावयाच्या असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.