शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर ! राजस्थामध्ये अडकलेल्या १ हजार ७६४ विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आज रात्री धुळ्याहून ७२ बस निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:47 IST

राज्यात परत आणावे यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी राज्यशासनाकडे विविध माध्यमातून मागणी केली जात होती.

ठळक मुद्देजवळपास १५ तासांच्या प्रवासानंतर या ७२ बस कोटा येथे पोहोचणार आहेत.

-  अनुराग  पोवळे 

नांदेड : राजस्थान कोटा इथे अडकलेल्या राज्यातील १ हजार ७६४ विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळे येथून राज्य परिवहन विभागाच्या ७२ बस आज बुधवारी रात्री निघणार आहेत. यामुळे लॉकडाऊनमध्ये कोटा येेेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.       राजस्थानातील कोटा येथे आय आय टी, जे ई ई आदी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देशभरातून विद्यार्थी जात असतात. महाराष्ट्रतूनही जवळपास दोन हजार विद्यार्थी राजस्थानात लॉकडावूनमध्ये अडकले आहेत. राज्यात परत आणावे यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी राज्यशासनाकडे विविध माध्यमातून मागणी केली जात होती.      

नांदेड जिल्ह्यातीलही जवळपास २०० विद्यार्थी राजस्थानमध्ये अडकले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. या विषयात राज्यातील अन्य नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा करत विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. मंत्रालयातही विशेष अधिकाऱयांची नियुक्ती करून माहिती एकत्रीत केली. अखेर या प्रकरणात विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील १ हजार ७६४ विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी ७२ बस आज बुधवारी रात्री ११ वाजता धुळे येथून निघणार आहेत. जवळपास १५ तासांच्या प्रवासानंतर या ७२ बस कोटा येथे पोहोचणार आहेत.      

या बसच्या ताफ्यासोबत विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नरेंद्र चित्ते आणि विभागीय वाहतूक अधीक्षक पंकज देवरे हे राहणार आहेत. संपर्कासाठी ९०२१३३६२३४ आणि ७५८८५२०४३६ हे क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड