शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता भाजपाकडे द्या, निधी कमी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:25 IST

लोहा शहरात अनेक पक्षांनी सत्ता उपभोगली. परंतु, शहराचा विकास करण्यात ते अपयशी ठरले.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

लोहा : लोहा शहरात अनेक पक्षांनी सत्ता उपभोगली. परंतु, शहराचा विकास करण्यात ते अपयशी ठरले. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपाच्या हाती सत्ता सोपवा. सत्ता दिल्यास लोहा शहराला निधी कमी पडणार नाही, असा शब्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे पाटील यांनी दिला.लोहा नगरपालिका निवडणूक भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी खा.दानवे यांनी भाजपा पक्षाची वाढ, केंद्र व राज्य सरकारने मागील चार वर्षात राबविलेल्या विविध योजना, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलेला दिलासा याबाबत ऊहापोह केला. एकेकाळी भाजपाच्या बैठकीला सरपंच येत नव्हते. तेथे आज भाजपाचे ५ हजारावर सरपंच असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी मतदारांनी पूर्वी केलेले मतदान हे पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडण्यासाठी केले. आताचे मतदान हे आपल्या शहराच्या विकासासाठी करायचे आहे. असे सांगत, यापूर्वी सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना शहरातील मूलभूत सुविधा पुरविण्यात यश आले नाही, असा आरोप केला. आ.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या उमेदवारांना विजयी करुन पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कमळाकडे द्या. विकासासाठी निधी कमी पडणार नाही. भाजपा सरकारने या भागात तीन महामार्ग आणले आहेत. चौथा महामार्ग जाहीर केला आहे. आमचे सरकार आल्यापासून शेतकरी कर्जमाफी सारखा मोठा निर्णय घेतला. आता कुटुंब घटकापेक्षा व्यक्ती हा घटक करत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.यावेळी माजी खा. भास्करराव पा. खतगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राम पा.रातोळीकर, आ.विनायकराव पाटील, भाऊराव देशमुख, लातूर भाजपा जि.अध्यक्ष नागनाथ निडवदे, नांदेड महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, देवीदासराव राठोड, अ‍ॅड. सुरेंद्र घोडजकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, दिलीप कंदकुर्ते, श्रावण पा.भिलवंडे, माधव साठे, लक्ष्मण ठक्करवाड, नागनाथ घिसेवाड, मिलिंद देशमुख, गणेश पा.सावळे, जि.प.सदस्य प्रवीण पा.चिखलीकर, प्रणिती देवरे-चिखलीकर माधवराव देवसरकर, आदींची उपस्थिती होती.माझा पायगुणच चांगलाभाजपा पक्षवाढीचा आता वेग वाढला आहे. राज्यात मी जिथे प्रचाराला जातो. तेथील पालिका, म.न.पा.निवडणुकीत भाजपा विजयी झाली, असा दावा खा़ दानवे यांनी केला़

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवे