शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘गिरीराज’कडून पिशव्यांचे काम काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:22 IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेमार्फत मोफत वाटप करावयाच्या कापडी पिशव्यांचे काम अखेर ‘गिरीराज’ कडून काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.

ठळक मुद्देमहिला आर्थिक विकास महामंडळाकडे निधी वर्ग करण्याचे महापालिकेला आदेश

नांदेड : पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेमार्फत मोफत वाटप करावयाच्या कापडी पिशव्यांचे काम अखेर ‘गिरीराज’ कडून काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.प्लास्टिकबंदी निर्णयानंतर कापडी पिशव्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड महापालिकेला जिल्हा नियोजन समितीमार्फत सव्वा कोटी रुपये देण्याचा निर्णय पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतला. या निर्णयानुसार हे काम बचत गटांना दिले जाईल, असे खुद्द कदम यांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम ठेकेदारांच्या घशात घालण्यात आले. सप्टेंबर २०१८ मध्ये ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. पिशव्यासाठी कपड्याचा पुरवठा करण्याचे काम गिरीराज सेल्स कार्पोरेशनला तर कापडी पिशव्या शिवून देण्याचे काम गिरीराज फाऊंडेशनला दिले होते. ४५ बाय ३०, ३० बाय ३० आणि ४५ बाय ४५ या आकाराच्या पाच लाख पिशव्या शिवण्याचे काम सदर ठेकेदारास दिले होते. मात्र, हे काम करण्याची आर्थिक क्षमता सदर ठेकेदाराकडे नसल्याने हा निधी महापालिकेने तात्काळ महिला आर्थिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निधी प्राप्त झाल्यानंतर ‘माविम’ ने एका महिन्याच्या आत कापडी पिशव्या तयार करुन शहरात वाटप कराव्यात, असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाRamdas Kadamरामदास कदम