शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

लोह्यात गॅसचा स्फोट; जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST

पीककर्ज द्या किनवट : इस्लापूर सर्कलमधील राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्ज वाटप केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत असून पीककर्ज ...

पीककर्ज द्या

किनवट : इस्लापूर सर्कलमधील राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्ज वाटप केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत असून पीककर्ज न दिल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देऊ, असे प्रतिपादन शिवसेना सर्कल प्रमुख गजानन बच्चेवार यांनी केले. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.

बिरसा मुंडा यांची जयंती

बिलोली- शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. पी. पांडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, सचिव डॉ. मीनलताई पाटील यांनी बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.

बससस्थानके गजबजली

देगलूर- अनलॉकनंतर नांदेड जिल्ह्यातील बसस्थानकात प्रवाशांची रेलचेल वाढली आहे. जिल्हांतर्गत तसेच परजिल्ह्यांत जाण्यासाठी प्रवासी बसस्थानकात गर्दी करत असून राज्य परिवहन महामंडळाने जुनेच तिकीट दर आकारल्याने प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

लोकसहभागातून पाणंद रस्त्याचे काम

हदगाव- तालुक्यातील सिबदरा येथील शेतकऱ्यांना पाणंद रस्ता नसल्याने शेतातून ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या भागातील शेतकऱ्यांनी लोकसहभाग तयार करून जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाणंद रस्ता करण्याचे काम हाती घेतले. त्यात गावचे सरपंच, उपसरपंच तसेच प्रतिष्ठीत नागरिकांनी सहभाग नोंदविला.

तालुकाध्यक्षपदी नाईकवाडे

देगलूर- राष्ट्रवादी पदवीधर सेलच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी बालाजी नाईकवाडे यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी विवेक पडकंटवार, उपसरपंच मुजिबोद्दीन चमकुडे, प्रवीण इनामदार, सचिव इरेवाड, किशोर आडेकर श्रीराम पाटील आदी उपस्थित होते.

नरसीत गर्दी

नरसीफाटा- कोरोना निर्बंध शिथील होताच नरसी बाजारपेठेत लोकांची गर्दी होत आहे. सामाजिक अंतर, मास्कचा विसर नागरिकांना पडला तर दुसरीकडे अनेक दिवसांपासून बससेवा बंद होती. बसस्थानकात बसेस दिसू लागल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

वीज पडून गाय ठार

हदगाव- हदगाव तालुक्यातील पळसा शिवारात गोठ्यावर वीज पडून चार शेळ्यांसह एक गाय दगावल्याची घटना ८ जून रोजी घडली. दत्ता कोंडीबा आडेराव यांची गाय व शेळ्या होत्या. त्यात त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी कुलकर्णी, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉ. तडकेवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दुचाकीचा अपघात

लोहा- तालुक्यातील सोनखेडपासून २ किमी अंतरावरील धाब्याजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. ९ जूनला दुपारी ही घटना घडली. त्यामध्ये एकजण गंभीर तर दोघे जखमी झाले. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. लोहा पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

कंधार- तालुक्यातील नरपटवाडी येथील युवक विलास कोळगिर यांचा शेतीकाम करताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतीकाम करत असताना शेतातून गेलेली विद्युत तार ट्रॅक्टरला अडकून विलास यांना विजेचा तीव्र धक्का बसला. अन्य एकजण यातून बचावला. जि. प. सदस्य बाळासाहेब गोमारे यांनी शवविच्छेदनासाठी मदत केली.

सोयाबीन पेरणीस सुरुवात

हदगाव- हदगाव तालुक्यातील उंचेगाव बु.परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरुवात केली आहे. उंचेगावसह परिसरात रिमझीम पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. त्यातच ८ जून रोजी मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरुवात केली.

मुख्य रस्ता चिखलमय

नायगाव- मांजरम येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. दहा हजार लोकसंख्येचे मांजरम गाव आहे. नायगाव तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. नालीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने सर्वत्र चिखल होऊन विविध साथीचे आजारदेखील होण्याची शक्यता आहे.

बिरसा मुंडा यांना अभिवादन

किनवट- तालुक्यातील पळशी ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी जी. व्ही. कोटरंगे, सरपंच प्रदीप चव्हाण, रमेश पडगीलवार, निखिल परचाके, बळिराम मन्नाके, विश्वास पाटील, दशरथ प्रधान, वामन चव्हाण, गोविंद सोनुले आदी उपस्थित होते.

बामणीत रक्तदान शिबिर

हदगाव- तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान बामणीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४१ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला अमोल चव्हाण, बालाजी देशमुख, डॉ. देवराय, बी. डी. पवार, राम पाटील, संदीप देशमुख, वैभव चव्हाण, सुरज डाखोरे, ओम भोसकर, कृष्णा माने, चाणक्य भोसकर, कृष्ण पवार, सागर कोटुरवार, नकुल देशमुख, राम शिंदे आदी उपस्थित होते.