शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘सत्यदास’ने बनविले गर्भश्रीमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:34 IST

५७ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत नाट्यभारती, इंदोरच्या वतीने शुक्रवारी मनोज महाजन लिखित श्रीराम जोग दिग्दर्शित ‘सत्यदास’ हे नाटक सादर झाले. दिवसरात्र यांच्या मिलनातून वेळ जन्माला येते. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा त्याचा उपयोग घ्यावा असा संदेश नाटकातून देण्यात आला़

ठळक मुद्देराज्य नाट्यस्पर्धा : संधीचा उपयोग करुन घेण्याचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ५७ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत नाट्यभारती, इंदोरच्या वतीने शुक्रवारी मनोज महाजन लिखित श्रीराम जोग दिग्दर्शित ‘सत्यदास’ हे नाटक सादर झाले. दिवसरात्र यांच्या मिलनातून वेळ जन्माला येते. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा त्याचा उपयोग घ्यावा असा संदेश नाटकातून देण्यात आला़एक गरीब किराणा दुकानदार रघुनाथ ( श्रीराम जोग ) आणि त्याची पत्नी यमुना (प्रतीक्षा बेलसरे ) यांच्या लग्नाला अनेक वर्षे होऊनसुद्धा त्यांना मूलबाळ नसते. एके दिवशी त्यांच्या घरी वृद्ध सत्यदास (विकास डीडोरकर) आसरा मागायला येतो. तो एक रात्र राहतो आणि निघून जातो. तो गेल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरा आढळतात. रघुनाथ त्या सोन्याच्या मोहरा सत्यदासला परत देण्यासाठी त्याचा शोध घेतो; पण यमुना त्या मोहरा परत देण्यास तयार नसते. ती म्हणते त्या सर्व मोहरा विकून मोठे किराणा दुकान उभे करु़ यमुना स्वत:साठी दागिने बनविते़ अशातच दिवाळीला सत्यदास पुन्हा परत येतो. त्याला पुन्हा एक दिवसाचा आश्रय हवा असतो. रघुनाथ आणि यमुना चिंतेत पडतात़ सर्व वैभव परत केल्यास आपण पुन्हा गरीब होवू म्हणून यमुना सत्यदासास मारण्याचा विचार करते; पण रघुनाथ विरोध करतो. दुसºया दिवशी तो सत्यदासास विचारतो की तू याआधी इथे काही विसरलास का? पण तो न बोलता निघून जातो. यावेळेस सत्यदास ज्या ठिकाणी झोपला होता तिथे त्यांना गर्भधारणेची जडीबुटी मिळते. यावर रघुनाथ यमुनास म्हणतो आधीची संधी मला कळाली नाही आणि आताची तुला कळाली नाही़ आधी सत्यदासाने आपणास श्रीमंत बनवले आणि आता गर्भ श्रीमंत. या नाटकात अनंत मुंगी, प्रफुल्ल जैन, श्रीरंग डीडोळकर, सुवर्णा गोडबोले, अरुण खळे, स्वानंद डीडोळकर, लोकेश निमगावकर, अनिरुद्ध किरकिरे, जय हाडीर्या, शुभम लोकरे, अमोध किरकिरे, संस्कृती बेलसरे, हिरण्यमयी, किरकिरे यांनी भूमिका साकारल्या.