शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हॅप्पी क्लबने केले साडेचारशे जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:17 IST

शिवराज बिचेवार नांदेड : कोरोनाचा कहर वाढत असताना ज्यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे येत नव्हते, त्यावेळी नांदेडातील ...

शिवराज बिचेवार

नांदेड : कोरोनाचा कहर वाढत असताना ज्यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे येत नव्हते, त्यावेळी नांदेडातील मुस्लिम तरुणांच्या हॅप्पी क्लबने पुढाकार घेतला. महापालिकेकडून फक्त पीपीई किट घेऊन या तरुणांनी नि:स्वार्थपणे जवळपास साडेचारशेहून अधिक जणांवर अंत्यसंस्कार केले. त्याबद्दल प्रशासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

नांदेडात आतापर्यंत कोराेनामुळे ६१० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी एप्रिल महिन्यात गेला होता. पिरबुर्हाणनगर येथील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी मुस्लिम तरुणांच्या हॅप्पी क्लबने ही जबाबदारी घेतली. त्यानंतर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सर्वच मृतदेहांवर अंत्यसंस्कार या तरुणांनी केले. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही. एकाच दिवशी जवळपास सात ते आठ अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशाप्रकारे जवळपास साडेचारशे जणांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले. या कामात जवळपास ४० तरुण सहभागी झाले होते. अंत्यसंस्कार केल्यानंतर अंगावर सॅनिटायझरचा फवारा मारायचा अन् नंतर कार्यालयात गेल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करायची अन् त्यानंतरच घर गाठायचे, असा त्यांचा नित्यक्रम होता. दररोज अंत्यसंस्काराहून घरी परतल्यावर चिमुकल्यांना तर कोरोना होणार नाही ना? याची चिंता वाटायची. परंतु आपण केलेल्या कामाच्या समाधानामुळे रात्री झोपही चांगली यायची, अशी प्रतिक्रिया या तरुणांनी दिली.

चौकट- परमेश्वराने आमची निवड केली याचा आनंद

कोरोनाने मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे नव्हते. जवळचे नातलग दूर थांबत होते. अशावेळी मृत्यू पावलेल्यांचे नातेवाईक होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी परमेश्वराने आमची निवड केली असे वाटते. पटापट मरणारी माणसे पाहून दु:खही व्हायचे; परंतु अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंदही होता. - मोहम्मद शोएब मोहम्मद खालेद

आपल्यामुळे घरी कोरोना तर होणार नाही याची चिंता

दररोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर घरी परत जायची भीती वाटायची. आपल्यामुळे आपल्या चिमुकल्यांना किंवा इतर सदस्यांना कोरोना झाला तर कसे? याची चिंता असायची. घरी अनेकवेळा तसे बोलूनही दाखविले; परंतु कुटुंबातील सदस्यांनीही हे परमेश्वराचे काम आहे असे म्हणून धीर दिला. - शेख आफताब शेख युनूस

कोण आहेत हॅप्पी क्लबचे सदस्य

हॅप्पी क्लबमध्ये मोहम्मद शोएब मोहम्मद खालेद, शेख आफताब शेख यूनूस, कुरेशी मो.दाईम गौस कुरेशी, मोहम्मद कासीम खान मुनवर खान, मोहम्मद मोईज बागवान अब्दूल हबीब, जुनेद खान सौदागर रशीद खान, मिर्झा सोहेल मिर्झा अताउल्ला बेग, अब्दूल सलाम मोहम्मद अफसर, सय्यद यासीन अली सय्यद युनूस अली, सय्यद बिलाल सय्यद बशीर, आदींचा समावेश आहे.