शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढीचे आदेश पोहोचले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील ...

ठळक मुद्दे एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकºयांनी बँकेच्या रांगेत धक्के खात पीक विमा भरला होता, परंतु अद्यापही जिल्ह्यात ३ लाख ७० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती़ राज्यभरात अशीच अवस्था होती़ त्यात शासनाने पीक विमा स्वीकारण्यास ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली़ परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबतचे आदेशच मिळाले नसल्यामुळे मुदतवाढीचा आजचा पहिला दिवस वाया गेला़गतवर्षी पीक विमा योजनेसाठी खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ६७ हजार ९७३ शेतकºयांनी अर्ज केले होते़ त्यांना राज्यभरात उच्चांकी ५०२ कोटींची नुकसान भरपाईही मिळाली होती़ खरिप हंगामात या शेतकºयांनी पीक विमा कंपनीकडे ३० कोटी ४० लाखांचा हप्ता भरला होता़ त्यामुळे नुकसान भरपाईपोटी ४ लाख ४४ हजार ७४ शेतकºयांना त्याचा लाभ मिळाला होता़विशेष म्हणजे, २०१६ मध्ये खरिपाची ७ लाख ६९ हजार २५० हेक्टरवर पेरणी झाली होती़ यंदा ९८ टक्के पेरणी झाली आहे़ त्यात मृग आणि पुनवर्सू नक्षत्रानंतर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ त्यामुळे विविध राजकीय पक्ष, संघटना, शेतकºयांकडून पीक विम्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती़त्याबाबत सोमवारी शासनाने घोषणाही केली होती़ त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला होता़ परंतु मंगळवारी दिवसभर मुदतवाढी संदर्भात बँकांना आदेशच मिळाले नाहीत़बँक अधिकारीही संभ्रमात होते़ त्यामुळे जिल्ह्यातील एकाही बँकेने आज दिवसभरात शेतकºयांचा पीक विमा स्वीकारला नाही़ त्यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले असून मुदतवाढीचा पहिला दिवस वाया गेला़