अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ४०, हदगाव २, नायगाव २, परभणी ३, नांदेड ग्रामीण १४, कंधार ४, वाशिम १, लातूर २, अर्धापूर २, माहूर २, उमरखेड १, आदिलाबाद २, देगलूर २, मुखेड ४ तर हिंगोली येथील एक जण नांदेडमध्ये बाधित आला. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार १८७ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील ३४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
चौकट..........
नांदेड शहरातील दोघांसह पाच जणांचा मृत्यू....
मागील २४ तासात आणखी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील दोघेजण नांदेड शहरातील आहेत. सिडको येथील ४५ वर्षीय पुरुष आणि गाडीपुरा येथील ६५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर उमरी येथील २५ वर्षीय तरुण, अर्धापूर येथील ७७ वर्षीय वृद्ध आणि बिलोली येथील ६५ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची संख्या १८८९ एवढी झाली आहे.
शासकीय रुग्णालयात २३८ खाटा उपलब्ध...
बुधवारी आणखी २८१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ८६ हजार १३७ एवढी झाली आहे. एकीकडे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे बाधित रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शासकीय रुग्णालयातही आता मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध होत आहेत. बुधवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १२३ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ११५ खाटा शिल्लक होत्या.