शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:39 IST

ग्रामपंचायत अधिनियमानुसार विहीत मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याने उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अपात्र घोषित केले आहे.

उमरी : ग्रामपंचायत अधिनियमानुसार विहीत मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याने उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अपात्र घोषित केले आहे.सरपंच देवीदास गंगाराम मुंडफळे, राजेंद्र गंगाराम कांबळे, राजाबाई यशवंत कांबळे, निर्मला अशोक कचकलवाड, रूक्मिणबाई कोमाजी सुरणे या पाच जणांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्दबातल ठरविले आहे.याप्रकरणी पिराजी व्यंकटी जरपटवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे अ‍ॅड. एस. के. पुजारी यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती. वरील पाच सदस्यांनी जुलै २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत जात पडताळणी समितीने दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या उर्वरित कालावधीकरिता सदस्यपदावरून अपात्र घोषित करण्यात यावे, यासाठी विवाद अर्ज दाखल केला होता.या अर्जाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम (१०) १ (अ) नुसार निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे मानण्यात येईल आणि ते सदस्यपदी राहण्यास अपात्र राहतील, अशी अधिनियमात तरतूद आहे.या प्रकरणातील वादी पिराजी जरपटवाड यांचा अर्ज मंजूर करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की , देवीदास मुंडफळे, राजेंद्र कांबळे, राजाबाई कांबळे, निर्मला कचकलवाड व रूक्मीणबाई कोमाजी सुरणे या पाच जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व उर्वरित कालावधीसाठी अनर्ह ठरविण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडPoliticsराजकारण