शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुत्राचा सातासमुद्रापार डंका, एक लाख तास आयुष्य असलेल्या एलईडीचे मिळवले पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 19:19 IST

अभिजीत कदम याने व्हाईट एलईडीवर नवीन मटेरियल शोधले आहे आणि त्यावर वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी दोन पेटंटसाठी अनुदान मिळविले आहे.

ठळक मुद्देअवघ्या १४ महिन्यात १६ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जरनलमध्ये त्याने प्रकाशित यातील दोन पेटंटला आंतरराष्ट्रीय अनुदान मिळाले आहे

हदगाव (जि. नांदेड) : तालुक्यातील साप्ती येथील शेतकऱ्याच्या एका मुलाने आपल्या नावाचा डंका सातासमुद्रापार वाजविला आहे. त्याने एक लाख तास आयुष्य असलेल्या व्हाईट एलईडी बल्बचे पेेटंट मिळवले असून, आतापर्यंत त्याला दोन पेटंटसाठी आंतरराष्ट्रीय अनुदानसुद्धा मिळाले आहे. जपानच्या तीन वैज्ञानिकांना ज्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते, त्यांच्याच कार्याचे पुढील संशोधन करून २०२० मध्ये व्हाईट एलईडीच्या ऑस्ट्रेलियन पेटंटवर आंतरराष्ट्रीय अनुदान मिळवण्याचे महान कार्य साप्ती येथील अभिजीत रमेशराव कदम या शेतकऱ्याच्या मुलाने केले. त्याने लॉकडाऊनच्या काळातही आपले संशोधन कार्य सुरूच ठेवून अनोखा उपक्रम राबविला. 

२०१४ मध्ये जपानचे तीन वैज्ञानिक इशामू अंकासाकी, हिरोशी अमानो आणि शुजी नाकापोरा या तीन वैज्ञानिकांना ब्ल्यू एलईडीवर जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर अभिजीत कदम याने व्हाईट एलईडीवर नवीन मटेरियल शोधले आहे आणि त्यावर वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी दोन पेटंटसाठी अनुदान मिळविले आहे. एलईडी हा आजच्या काळात ऊर्जा बचतीसाठी खूप महत्त्वाची प्रकाश व्यवस्था असून, त्याचे आयुष्यमान एक लाख तास आहे. तो सध्या प्रचलीत असलेल्या सीएफएल बल्बच्या पाचपट अधिक वीज बचत करून अधिक प्रकाश देतो. या बाबींचा सामान्यांना फायदा होईल, असे अभिजीत कदम याने सांगितले.

अवघ्या १४ महिन्यांत १६ शोधनिबंधअभिजीत कदम यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील डॉ. संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीचे प्रशिक्षण घेत आहे. अवघ्या १४ महिन्यात १६ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जरनलमध्ये त्याने प्रकाशित केले असून, ती पेटंट प्रकाशित केले आहे. यातील दोन पेटंटला आंतरराष्ट्रीय अनुदान मिळाले आहे. अभिजीत कदम यांचे १३ बुक ऑफ चाप्टर विविध आंतरराष्ट्रीय पुस्तकांमध्ये प्रकाशनासाठी अभ्यासाधीन असून, दोन बुक चाप्टर नाना प्रकाशनाच्या आंतरराष्ट्रीय पुस्तकात प्रकाशित झाले आहेत.

टॅग्स :scienceविज्ञानNandedनांदेडelectricityवीज