शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

शेतकऱ्यांची शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ; नोंदणीपैकी १० टक्केही तूर खरेदी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:30 IST

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीनबरोबर तुरीचे उत्पन्नही चांगल्या प्रमाणात होत आहे़

ठळक मुद्देनोंदणीसाठी १५ मार्चपर्यंतची मुदत

- श्रीनिवास भोसले

नांदेड:  शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमालाची विक्री करता यावी म्हणून जिल्ह्यात जवळपास १३ ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ परंतु, शासकीय खरेदी केंद्रासाठीच्या जाचक अटी आणि विलंबामुळे बहुतांश तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सदर केंद्रांकडे पाठ फिरविली आहे़ आजपर्यंत केवळ ७८५ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपली तूर विकली आहे़ 

नांदेड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीनबरोबर तुरीचे उत्पन्नही चांगल्या प्रमाणात होत आहे़ कापसामध्ये तूर घेण्याबरोबर स्वतंत्र तुरीचा पेरा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे़ नांदेड जिल्ह्यात दुहेरी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने अंतर्गत पीक म्हणून बहुतांश शेतकरी तूर, मूग, उडीद या पिकांना प्राधान्य देतात़ शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकता यावा आणि त्यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आधारभूत भाव मिळावा या उद्देशाने शासनाने जवळपास १३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले आहेत़ केंद्र शासनाने तुरीसाठी प्रतिक्विंटल ५ हजार ८०० रूपये भाव जाहीर केला आहे़ परंतु, तुरीची आर्द्रता आणि गुणवत्तेनुसार भाव देत व्यापाऱ्यांसह खरेदी केंद्राकडूनदेखील कमी भावानेच तूर खरेदी केली जाते़ त्यातच आॅनलाईन नोंदणी आणि त्यानंतर खरेदी केंद्राकडून मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर खरेदी केंद्रावर माल घेऊन जायचा असतो़ अशा किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे बहुतांश शेतकरी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवित असल्याचे पाहायला मिळत आहे़ नांदेड जिल्ह्यातील ११ हजार ४४२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ त्यापैकी १ हजार ४९९ शेतकऱ्यांना आजपर्यंत खरेदी केंद्रावर शेतमाल आणण्यासाठी केंद्राकडून एसएमएस पाठविण्यात आला़ त्यातही केवळ ७८५ शेतकऱ्यांनी आपला माल खरेदी केंद्रावर आणला आणि विक्री केला़ जवळपास ३ हजार ८८७ क्विंटल तूर खरेदी आजपर्यंत करण्यात आली आहे़ त्यापैकी एकाही शेतकऱ्यास आजपर्यंत तुरीचे चुकारे अदा करण्यात आलेले नाहीत़ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि केंद्रावर माल खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या यात मोठी तफावत आहे़  बहुतांश शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरविली आहे़ 

नोंदणी ११४४२ शेतकऱ्यांची; खरेदी ७८५नांदेड जिल्ह्यातील आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर शेतमाल खरेदीसाठी जिल्ह्यात सुरू केलेल्या १३ खरेदी केंद्रांवर ११ हजार ४४२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ त्यापैकी १ हजार ४९९ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले असून केवळ ७८५ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली़ च्नांदेड खरेदी केंद्रावर ८४५ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली, त्यापैकी ४० शेतकऱ्यांचा माल आजपर्यंत खरेदी करण्यात आला़ तसेच मुखेड केंद्रावर १४७३ पैकी ११३ शेतकऱ्यांचा माल खरेदी केला़ हदगाव - २ हजार ४०६ पैकी १४०, किनवट - २ हजार ३२१ पैकी ५९, नायगाव - ९८० पैकी १४०, भोकर - ७५० पैकी ०, धर्माबाद - ८५४ पैकी १३९, धानोरा ता़ धर्माबाद - ६२८ पैकी ८९, करडखेड ता़देगलूर - १०० पैकी ०, बरबडा ता़ नायगाव - ३१ पैकी ०,  लोहगाव ता़बिलोली - ४७८ पैकी १८,  नरनाली ताक़ंधार - ३१० पैकी ९,  मांडवी ता़ किनवट - २६६ पैकी ३८ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीState Governmentराज्य सरकार