बियाणे वितरणात नमूद केलेल्या कडधान्य बियाणासाठी १० वर्षांआतील वाणास ५० रुपये प्रती किलो, १० वर्षांवरील वाणास २५ रुपये प्रती किलो, ज्वारी सरळ वाणाचे बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास ३० रुपये प्रती किलो, १० वर्षांवरील वाणास १५ रुपये प्रती किलो. सोयाबीन पिकासाठी १० ते १५ वर्षांच्या वाणास १२ रुपये प्रती किलो याप्रमाणे आहे. एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादित लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार २ हजार ते ४ हजार रुपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.