शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची मंजुरी नसताना अभियंता दोन वर्षे निलंबित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST

कृष्णनाथ रामचंद्र पिसे, असे या उप अभियंत्याचे नाव आहे. ते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे कार्यरत हाेते. त्यांच्यावर एसीबीचा ट्रॅप ...

कृष्णनाथ रामचंद्र पिसे, असे या उप अभियंत्याचे नाव आहे. ते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे कार्यरत हाेते. त्यांच्यावर एसीबीचा ट्रॅप झाला. मात्र, एसीबीच्या दाेषाराेपपत्राला शासनाने मंजुरीच दिली नाही. दरम्यानच्या काळात १३ एप्रिल २०१८ ला त्यांना निलंबित करण्यात आले. ३ मार्च २०२० पर्यंत ते निलंबित हाेते. त्यानंतर ३१ मे २०२१ ला ते सेवानिवृत्त झाले. आपला दाेन वर्षांचा निलंबन काळ ड्यूटी पिरियड धरावा यासाठी त्यांनी ॲड. गाैरव अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली. तेथे जलसंपदा सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले. त्यांचा निलंबन कालावधी शिल्लक रजेतून वजा करून रजा राेखीकरणात वळविल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी फाैजदारी केस, खातेनिहाय चाैकशी याला मंजुरी नसल्याने निलंबन समर्थनीय ठरत नसल्याचे आदेशात नमूद आहे. याकडे मॅटचे लक्ष वेधले गेले. अखेर मॅटने पिसे यांना दिलासा देत एक महिन्यात त्यांना पूर्ण लाभ देण्याचा आदेश जारी केला.

चौकट....

सरकारच तरतुदीचे पालन करीत नाही

निलंबन कालावधी शिल्लक रजामध्ये वळता करण्यास मॅटने विराेध दर्शविला. सरकारच कायद्यातील तरतुदीचे पालन करीत नसल्याचा ठपका यावेळी मॅटने ठेवला. याप्रकरणात शासनाच्या वतीने ए.जे. चाैगुले यांनी काम पाहिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. भूषण बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.